रत्नागिरी पाटीलबाबाच्या अटकेने म्हासुर्ली परिसरात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:25 PM2017-09-23T21:25:58+5:302017-09-23T21:25:58+5:30
म्हासुर्ली : झरेवाडी-रत्नागिरी येथील स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे सांगून चमत्कार करणारा भोंदू बाबा पाटीलबाबा याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच
म्हासुर्ली : झरेवाडी-रत्नागिरी येथील स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे सांगून चमत्कार करणारा भोंदू बाबा पाटीलबाबा याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच धामणी खोºयासह कळे, भोगावती व राधानगरी परिसरातील भक्तांमध्ये खळबळ उडाली. बाबाने केलेल्या फसवणुकीबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दर गुरुवारसह अमावस्या, पौर्णिमेला बाबाचा मोठा दरबार भरवला जात होता. या दरबारातच उपस्थित भक्तांच्यासमोर बाबा चमत्काराच्या दाव्यासह अनेक विक्षिप्त प्रकार करत असल्याच्या चर्चा भक्तांमध्ये सुरू आहेत.
म्हासुर्लीसह गगनबावडा परिसर, धामणी खोरा, कळे परिसर, भोगावती, राधानगरी परिसरातील अनेक गावातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर झरेवाडी येथील बाबांच्या दरबारात अगदी पोलिसांनी त्यांस अटक करेपर्यंत जात असत. अनेकांनी त्याच्या विक्षिप्तपणाचा, शिव्या खाण्याचा तसेच चमत्कार करण्याच्या प्रकाराचा अनुभव घेतला आहे. त्याने अनेकांना धार्मिक कर्मकांडे करावयास लावून गंडा घातला आहे.
दोनच दिवसांपूर्वी या भोंदू महाराजास अटक झाल्याचे समजताच त्याच्या भक्तांनी एकमेकांस संपर्क करून खात्री करून घेतली. तसेच केलेल्या चमत्काराबद्दल भक्तांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून त्याच्याकडे येणाºयास राजकारणी व सुशिक्षित नोकरदारांचा मोठा समावेश असल्याने हे संबंधित भक्तगण समाजात उघडपणे येऊन आपल्या फसवणुकीबद्दल सांगण्यात दचकत आहेत.