पोलिस हवालदार सुनेकडून सासूला पेटवून मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:56 IST2021-07-05T18:54:10+5:302021-07-05T18:56:07+5:30
Crime Kolhapur : कसबा बावडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलिस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूस पेट्रोल, डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद जखमी आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.

पोलिस हवालदार सुनेकडून सासूला पेटवून मारण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : कसबा बावडा डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात सोमवारी मध्यरात्री घरगुती वादातून पोलिस हवालदार असलेल्या सुनेने वयोवृद्ध सासूस पेट्रोल, डिझेल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद जखमी आशालता श्रीपती वराळे (वय ८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानूसार पोलिसांनी संशयित पोलिस हवालदार संगीता राजेंद्र वराळे (वय ५१, नेमणूक पोलिस मुख्यालय, रा. कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा नोंदविला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित या कोल्हापूर पोलिस दलात हवालदार म्हणून पोलिस मुख्यालयात नेमणूकीस आहेत. फिर्यादी आशालता या संशयितांच्या सासू आहेत. संशयित संगीता व सासू आशालता याच्यात पुर्वीचा कौटूंबिक व सांसारीक वाद होता. सोमवारी मध्यरात्री पुन्हा हा वाद उफळून आला. त्यात संशयित संगीता यांनी सासू आशालता यांना जीव मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडावर डिझेल किंवा पेट्रोल टाकून त्यावर पेटलेला कागद टाकून पेटविले. त्यात फिर्यादी सासू आशालता यांच्या तोंडास, मानेस व उजव्या हातापायास गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत सासूस अन्य नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान फिर्याद दिल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी भेट दिली.