१५० ते ३०० स्क्वेअर फूट जागेला दहा दिवसात बांधकाम परवाना देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:25+5:302021-01-25T04:26:25+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नव्याने मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) ही कागदावरच राहू ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नव्याने मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) ही कागदावरच राहू नये, यासाठी राज्यभर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. १५० ते ३०० स्क्वेअर फूट जागेला दहा दिवसात बांधकाम परवाना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन नगररचना महाराष्ट्र राज्य संचालक सुधाकर नांगनुरे यांनी दिले.
संचालकपदी नांगनुरे यांची निवड झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार व शासनाने नव्याने मंजूर केलेल्या ‘युडीसीपीआर’संबंधी माहिती देण्यासाठी येथील नगरपालिका सभागृहात क्रीडाई, आर्किटेक्ट असोसिएशन, इंजिनिअरिंग असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी नांगनुरे बोलत होते.
झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी बांधकाम परवाना आवश्यक आहे. परंतु, या जागेच्या कमतरतेमुळे साईड मार्जिन सोडणे जमत नाही. यासाठी त्याठिकाणी रो-हाऊस बांधून आहे त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे, यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान व वरील लागणाऱ्या रकमेसाठीचे कर्ज कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बॅँकेतून देण्याची ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी स्वागत केले. या बैठकीला नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, मनोज साळुंखे, संजय केंगार, सारिका पाटील, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
(फोटो ओळी) २४०१२०२१-आयसीएच-०२ इचलकरंजी नगरपालिकेत शासनाने नव्याने मंजूर केलेल्या ‘युडीसीपीआर’संबंधी नगररचना महाराष्ट्र राज्य संचालक सुधाकर नांगनुरे यांनी माहिती दिली. यावेळी तानाजी पोवार, संजय केंगार, सारिका पाटील, अलका स्वामी, आमदार प्रकाश आवाडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, मदन कारंडे, दीपक सुर्वे उपस्थित होते.