सासूस जीवे मारण्याचा प्रयत्न : संशयित महिलेस सोमवारपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:59+5:302021-07-07T04:30:59+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा येथे कौटुंबिक वादातून सासूला पेटविल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी संशयित महिला पोलीस हवालदारास अटक केली. संगीता राजेंद्र ...

Attempt to kill mother-in-law: Suspected woman remanded in custody till Monday | सासूस जीवे मारण्याचा प्रयत्न : संशयित महिलेस सोमवारपर्यंत कोठडी

सासूस जीवे मारण्याचा प्रयत्न : संशयित महिलेस सोमवारपर्यंत कोठडी

googlenewsNext

कोल्हापूर : कसबा बावडा येथे कौटुंबिक वादातून सासूला पेटविल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी संशयित महिला पोलीस हवालदारास अटक केली. संगीता राजेंद्र वराळे (वय ५१) असे संशयिताचे नाव आहे. तिला न्यायालयाने साेमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित वराळे पोलीस दलात हवालदार असून सध्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. त्यांनी कौटुंबिक वादातून सासू आशालता वराळे यांच्या तोंडावर पेट्रोल व कागद पेटवून तोंडावर टाकला. त्यात सासू आशालता भाजून जखमी झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी उशिरा रात्री संशयित वराळे यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी जळालेले कपडे, काडेपेटी, कागद जप्त केले. जखमी सासूची प्रकृती स्थिर आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोकरे करीत आहेत.

फोटो : ०६०७२०२१-कोल-संगीता वराळे-आरोपी

Web Title: Attempt to kill mother-in-law: Suspected woman remanded in custody till Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.