Kolhapur: इन्स्टाग्रामवरून फूस लावून दोन मुलींना पळविण्याचा प्रयत्न, चंदगड पोलिसांच्या सतर्कतेने दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:52 PM2023-08-18T13:52:45+5:302023-08-18T13:53:16+5:30

चंदगड : इन्स्टाग्रामवरून फूस लावून चंदगड येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या रोमिओंना गुरुवारी सतर्कमुळे त्यांना अवघ्या दोन तासांतच ...

Attempt to abduct two girls by seducing them on Instagram, Chandgad police have alerted them and arrested them | Kolhapur: इन्स्टाग्रामवरून फूस लावून दोन मुलींना पळविण्याचा प्रयत्न, चंदगड पोलिसांच्या सतर्कतेने दोघे अटकेत

Kolhapur: इन्स्टाग्रामवरून फूस लावून दोन मुलींना पळविण्याचा प्रयत्न, चंदगड पोलिसांच्या सतर्कतेने दोघे अटकेत

googlenewsNext

चंदगड : इन्स्टाग्रामवरून फूस लावून चंदगड येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या रोमिओंना गुरुवारी सतर्कमुळे त्यांना अवघ्या दोन तासांतच चंदगड पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले. याप्रकरणी दोघा युवकांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. साहिल प्रभळकर (वय २०), सकलेन शेख (२० दोघेही रा. चंदगड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली नसल्याचे समजताच फिर्यादीने घटनेचे गांभीर्य ओळखून ही बाब पोलिसांनी कळविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तत्परतेने चार वेगवेगळी पथके तयार करून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.  

त्यानंतर बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केल्यावर आणखीन एक मुलगी गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चंदगडमधीलच दोन युवक बेपत्ता मुलीच्या घराजवळच सकाळी चकरा मारत होते. अशी माहिती समोर आली. त्यानंतर संशयितांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यामधील एकाला चंदगडमधून तर एकाला दाटे येथून पोलिस पथकाने ताब्यात घेतले.

दरम्यान, त्या मुलींनी आपण हलकर्णी येथे आलो असून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून ही माहिती संशयित तरुणांना दिली. मात्र, आपण पळून जाणार ही बाबच पोलिसांना समजल्याचे त्यांनी मुलींना सांगताच त्यांनी सरळ चंदगड गाठले. पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच या प्रकरणाचा छडा लावला.

अनोळखींवर विश्वास ठेवू नका

कुठली घटना घडली तरी पोलिसांशी संपर्क करा तसेच अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांचे समुपदेशन करावे व सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या अनोळखी युवकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.

Web Title: Attempt to abduct two girls by seducing them on Instagram, Chandgad police have alerted them and arrested them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.