गडहिंग्लज कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:37+5:302021-09-02T04:54:37+5:30

निवेदनात म्हटले आहे, विशेष साधारण सभेत कारखाना चालवायला देण्याचा निर्णय सभासदांनी एकमताने घेतला आहे. परंतु, थकीत रक्कम मिळाल्याशिवाय कारखान्याचे ...

An attempt will be made to shut down the Gadhinglaj factory | गडहिंग्लज कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडणार

गडहिंग्लज कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडणार

Next

निवेदनात म्हटले आहे, विशेष साधारण सभेत कारखाना चालवायला देण्याचा निर्णय सभासदांनी एकमताने घेतला आहे. परंतु, थकीत रक्कम मिळाल्याशिवाय कारखान्याचे चाक फिरू देणार नाही, असा इशारा सेवानिवृत्त कामगार संघटनेने दिला आहे. सेवानिवृत्तांची थकीत रक्कम मिळालीच पाहिजे त्यात दुमत नाही. परंतु, कारखाना बंद पडला तर कामगार, शेतकरी, बैलगाडी व वाहनचालक मालक, तोडणी-ओढणी कामगार यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या हिताचा योग्य निर्णय घेऊन कारखाना वेळेत सुरू करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात, विश्वास खोत, लगमाण्णा भमानगोळ, शामराव नदाफ, रवींद्र खोत, सचिन पाटील, मानसिंग जाधव, दशरथ दळवी आदींचा समावेश होता.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना विश्वास खोत यांनी निवेदन दिले. या वेळी लगमाण्णा भमानगोळ, शामराव नदाफ, रवींद्र खोत, दशरथ दळवी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०१०९२०२१-गड-०८

Web Title: An attempt will be made to shut down the Gadhinglaj factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.