संजय गांधी व श्रावणबाळच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:55+5:302021-08-26T04:26:55+5:30

यावेळी संदीप पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये जाचक अटी लावल्याने अनेक लाभार्थी पात्र असूनही लाभ घेऊ शकले ...

Attempts to repeal the oppressive conditions of Sanjay Gandhi and Shravanbal | संजय गांधी व श्रावणबाळच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न

संजय गांधी व श्रावणबाळच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न

Next

यावेळी संदीप पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये जाचक अटी लावल्याने अनेक लाभार्थी पात्र असूनही लाभ घेऊ शकले नाहीत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. आघाडी सरकारच्या काळात या जाचक अटी रद्द करण्यासाठी विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, पी. एन. पाटील यांची भेट घेऊन जाचक अटी रद्द करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा पाटील, करवीर पंचायत समितीच्या सदस्या सविता पाटील, विजय भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सर्जेराव पुजारी, संतोष पोर्लेकर पृथ्वीराज चव्हाण, अमर वरुटे, शिवाजी तळेकर, मच्छिंद्र साळवी यांच्यासह सर्व गावांतील लाभार्थी उपस्थित होते.

Web Title: Attempts to repeal the oppressive conditions of Sanjay Gandhi and Shravanbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.