महापौरांच्या राजीनाम्याकडे लक्ष
By admin | Published: February 9, 2015 12:25 AM2015-02-09T00:25:17+5:302015-02-09T00:35:52+5:30
आज मनपाची सभा : राजीनामा न देण्यासाठी ‘राष्ट्रवादीं’चा एक गट सक्रीय
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी ठरल्याप्रमाणे आज, सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देणार की याकडे काँग्रेससह सर्वच नगरसेवकांना लक्ष लागून राहिले आहे. महापौरांनी राजीनामा न दिल्यास सभागृहास त्यांच्या विरोधात काहीही कारवाई करता येणार नाही. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौर राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले तरी राष्ट्रवादीतील एक गट महापौरांचा राजीनामा होऊ नये, यासाठी सक्रिय झाल्याने काँग्रेस गटात कमालीची अस्वस्थता दिसत आहे.लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी अटक व जामीन मंजूर झाल्यानंतर पदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले. त्या ठाम राहिल्यास त्यांना पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. महापौरांनी ठरल्याप्रमाणे सोमवारच्या सभेत राजीनामा देतील, असे खुद्द मुश्रीफ यांनी सांगितल्याने कॉँग्रेसमधील तणाव काहीसा निवळला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील एक गट राजीनामा होऊ नये यासाठी सक्रिय झाला. महापौरांच्या राजीनाम्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
महापौरांच्या राजीनाम्याकडे लक्ष
आज मनपाची सभा : राजीनामा न देण्यासाठी ‘राष्ट्रवादीं’चा एक गट सक्रीय
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी ठरल्याप्रमाणे आज, सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देणार की याकडे काँग्रेससह सर्वच नगरसेवकांना लक्ष लागून राहिले आहे. महापौरांनी राजीनामा न दिल्यास सभागृहास त्यांच्या विरोधात काहीही कारवाई करता येणार नाही. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौर राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले तरी राष्ट्रवादीतील एक गट महापौरांचा राजीनामा होऊ नये, यासाठी सक्रिय झाल्याने काँग्रेस गटात कमालीची अस्वस्थता दिसत आहे.
लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी अटक व जामीन मंजूर झाल्यानंतर पदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले. त्या ठाम राहिल्यास त्यांना पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. महापौरांनी ठरल्याप्रमाणे सोमवारच्या सभेत राजीनामा देतील, असे खुद्द मुश्रीफ यांनी सांगितल्याने कॉँग्रेसमधील तणाव काहीसा निवळला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील एक गट राजीनामा होऊ नये यासाठी सक्रिय झाला. महापौरांच्या राजीनाम्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी मीना सूर्यवंशी, दीपाली ढोणुक्षे, वैशाली डकरे, अपर्णा आडके, संगीता देवेकर, कांचन कवाळे यांपैकी एकीची वर्णी लागणार आहे. महापौरपदी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या पदाची खांडोळी करण्याचा पर्याय नेत्यांपुढे आहे. मात्र, दररोज बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातच महापौरपद मिळावे, असा इच्छुकांनी तगादा लावल्याचे समजते.
महापौरांच्या शेवटच्या सभेत ५०-५० विषय सभेपुढे ठेवण्यात येतात, मात्र, यावेळी माळवी लाचखोरीच्या संशयात अडकल्याने सभेपुढे मोजकेच विषय आहेत. याबाबत काय निर्णय होणार हे सभेतच ठरणार आहे.
‘जनसुराज्य’चे पुन्हा बंड
महापौरपदासाठी डावलल्यानंतरही स्थायी समिती सभापती वर्णी न लागल्याने बंडखोरी केलेल्या जनसुराज्य पक्षाच्या नगरसेविका मृदुला पुरेकर यांनी बंडाचे निशाण यापूर्वीच हाती घेतले आहे. यावेळी महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्धार माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी केला आहे. त्यामुळे जनसुराज्य स्थायी व परिवहन सभापती निवडणुकीप्रमाणेच महापौर निवडणुकीतही सवता सुभा मांडणार असल्याची चर्चा आहे.