अलमट्टीतील विसर्गावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:35+5:302021-07-23T04:16:35+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मात्र आणखी दोन दिवस असेच सुरू ...

Attention to Visarga in Almatti | अलमट्टीतील विसर्गावर लक्ष

अलमट्टीतील विसर्गावर लक्ष

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मात्र आणखी दोन दिवस असेच सुरू राहिले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार सध्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो योग्यरितीने हाेत आहे ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊस आणि पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, सध्या कोल्हापुरातील राधानगरी, दुधगंगा, पाटगांव, वारणा येथील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरला बॅकवॉटरचा त्रास होतो त्यामुळे अलमट्टीतून सुरू असलेल्या विसर्गावर कोल्हापूर, सांगलीचे लक्ष आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत चर्चा झाल्यानंतर विसर्ग अपेक्षेप्रमाणे होत आहे की नाही हे पाहण्यासाठी अलमट्टीवर एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या योग्यरितीने विसर्ग सुरू आहे. मात्र पाऊसच इतका पडत आहे की पाणी वाहून जाण्यालादेखील मर्यादा आहेत. घाटमाथ्यावर ४०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत आहे मे-जूनमध्ये पाऊस पडला त्याचवेळी धरणातील पाणी सोडल्याने पुराचा धोका कमी झाला आहे. पण कितीही पाऊस येऊ दे पुराशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये.

------

चिखलीतील ३२५ कुटुंबांचे स्थलांतर

पुराने सर्वात आधी चिखली आणि आंबेवाडी ही दोन गावं बाधीत होतात त्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू असून गुरुवारी चिखलीतील ३२५ कुटुंबांचे जनावरांचे सोनतळी येथे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या करवीर आणि शिरोळमध्ये एनडीआरएफची पथके पाठवण्यात आली असून गरज भासली तर राज्य शासनाकडे आणखी पथकांची मागणी केली जाईल.

---

कोरोनाबाधित व सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र सोय

सध्या अनेक कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत त्यांचे स्थलांतर करताना काय खबरदारी घेतली आहे यावर ते म्हणाले, प्रशासनाने स्थलांतराच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची व सर्वसामान्य नागरिकांची स्वतंत्र सोय केली आहे.

---

Web Title: Attention to Visarga in Almatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.