‘महापारेषण’च्या अधीक्षक अभियंतापदी अतुल मणूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:18+5:302021-08-28T04:29:18+5:30

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या कोल्हापूर अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदी अतुल चंद्रकांत मणूरकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार ...

Atul Manurkar as the Superintending Engineer of ‘Mahapareshan’ | ‘महापारेषण’च्या अधीक्षक अभियंतापदी अतुल मणूरकर

‘महापारेषण’च्या अधीक्षक अभियंतापदी अतुल मणूरकर

googlenewsNext

कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या कोल्हापूर अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदी अतुल चंद्रकांत मणूरकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

मणूरकर यांचे शालेय शिक्षण शहाजी हायस्कूलमध्ये झाले. नंतर सोलापूर येथे स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका घेतली. पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे वयाच्या १८ व्या वर्षी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ खापरखेडा, नागपूर येथे नोकरी पत्करली व सबइंजिनिअर या पदावर डिसेंबर १९८३ साली रुजू झाले. नोकरी करतानाच त्यांनी पुढील शिक्षण घेतले. नागपूर येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य शाखेतील एम टेक पदव्युत्तर पदवी घेऊन नागपूर विद्यापीठांत द्वितीय क्रमाकांने उत्तीर्ण झाले.

१९९८ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर नेमणूक झाली आणि २००५ मध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रूजू झाले. मुंबई येथे सांघिक कार्यालयात, पुणे, कऱ्हाड व सांगली येथे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले. पदोन्नतीवर अधीक्षक अभियंता म्हणून ते कोल्हापूर येथे रुजू झाले.

Web Title: Atul Manurkar as the Superintending Engineer of ‘Mahapareshan’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.