जिल्ह्यातील ६५ वाळू गटांचे होणार लिलाव
By admin | Published: January 4, 2015 09:18 PM2015-01-04T21:18:56+5:302015-01-05T00:40:01+5:30
१७ जानेवारीस लिलाव : कोट्यवधीचा महसूल मिळणार
भादोले : कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ वाळूगटांचे जाहीर लिलाव १७ जानेवारीला होणार असून, शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा होणार आहे. लिलावाची ई निविदा व ते ई लिलाव पद्धतीने होणार आहेत.
जिल्ह्यातील ६५ वाळूगटांचे जाहीर लिलाव १७ जानेवारीला होणार आहेत. २०१४-१५ च्या वाळू रेती गटाच्या लिलावाची ई निविदा व ते ई लिलाव पद्धतीने करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खननाच्या नियमानुसार हे लिलाव होत आहेत.
वाळूगटाची किंमत, अटी व शर्ती, इतर सर्व माहिती जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक ३ ते ११ जानेवारीपर्यंत नोंदणी आॅनलाईन पद्धतीने कागदपत्रे प्रत्यक्षात सादर करून नोंदणी मान्य करून घ्यावयाची आहे. दिनांक १२ ते १६ जानेवारीपर्यंत निविदा जमा करण्यात येणार आहेत, तर १७ जानेवारीला ई अॅक्शन (ई लिलाव)मध्ये भाग घेता येणार आहे.
शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीपात्रात ४५ वाळूगट आहेत.
यापैकी बस्तवाड येथे तीन, औरवाड येथे आठ गट, उदगाव येथे चार गट, कुटवाड येथे तीन गट, कवठेगुलंद येथे चार गट, कोथळी येथे चार गट, बुबनाळ येथे चार गट, शेडशाळ येथे तीन गट, खिद्रापूर येथे सहा गट, राजारापूर येथे दोन गट, तर हातकणंगले तालुक्यात वारणा नदीपात्रात चार वाळूंचे गट आहेत. यात घुणकी येथे तीन गट, रुकडी येथे एक गट, गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी व घटप्रभा नदी पात्रात १६ वाळूगट, महागाव येथे सहा गट, हेब्बाळ येथे तीन गट, भडगाव येथे तीन गट आहेत. असे जिल्ह्यात ६५ वाळूगटांचे जाहीर लिलाव १७ जानेवारीला होणार आहेत.