अवसायनात निघालेल्या भुदरगड पतसंस्थेत कोटीचा ढपला लेखापरीक्षणात उघड : साईक्स एक्स्टेंशन व कुडाळ शाखेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:04+5:302021-02-09T04:28:04+5:30

कोल्हापूर : अवसायनात निघालेल्या गारगोटी (ता. भुदरगड) येथील भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या येथील साईक्स एक्स्टेंशन व कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) ...

Audit reveals Rs. | अवसायनात निघालेल्या भुदरगड पतसंस्थेत कोटीचा ढपला लेखापरीक्षणात उघड : साईक्स एक्स्टेंशन व कुडाळ शाखेतील प्रकार

अवसायनात निघालेल्या भुदरगड पतसंस्थेत कोटीचा ढपला लेखापरीक्षणात उघड : साईक्स एक्स्टेंशन व कुडाळ शाखेतील प्रकार

Next

कोल्हापूर : अवसायनात निघालेल्या गारगोटी (ता. भुदरगड) येथील भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या येथील साईक्स एक्स्टेंशन व कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) शाखेत एक कोटी सात लाख ४३ हजार रुपयांचा ढपला पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यांनीच पाडला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. मुख्यत: ठेवीदारांच्या नावांवरील पैसे बनावट सह्या करून उचलून हा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी कुडाळ शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी बाळकृष्ण बंडा सोनार (रा. गंगापूर, ता. भुदरगड) व साईक्स एक्स्टेंशन शाखेचे शाखाधिकारी कृष्णात दत्तात्रय सावंत (रा. वडणगे, ता. करवीर) यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पतसंस्थेत २००३ ते २०१७ मध्ये हा अपहार झाला असून, कोल्हापूरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील यांच्या कार्यालयाने केलेल्या २०१३ ते २०१७ च्या लेखापक्षीण अहवालात हा गैरव्यवहार उघडकीस आला. तीन कर्जमाफी, व्याज परतावा ही कामे असतानाही या कार्यालयाने ही चौकशी पूर्ण केली आहे. पतसंस्थेचे मुख्यालय शाखा व अन्य आठ शाखांचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. ढपला पाडलेले दोन्ही शाखाधिकारी हे मूळचे पतसंस्थेचे कर्मचारी आहेत. गैरव्यवहारामुळेच या पतसंस्थेवर २४ सप्टेंबर २००२ ला सुरुवातीला प्रशासक मंडळ व त्यानंतर १३ फेब्रुवारी २००७ पासून अवसायक मंडळ आहे. सहकार खात्याचे अधिकारी असलेले अवसायक मंडळच व्यवहार पाहत असताना गैरव्यवहार करण्याचे धाडस केले आहे. सध्या संस्थेच्या आठ शाखा व मुख्यालयातील कारभार सुरू आहे. त्यामध्ये वसुली व ठेवी परत देण्याचे काम चालते. आजही ५० कर्मचारी काम करतात. विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय अवसायक समिती सध्या काम पाहते; परंतु हा गैरव्यवहार त्या आधीच्या काळातील आहे. (पूर्वार्ध)

असा झाला गैरव्यवहार

कुडाळ शाखा : ९६ लाख ३२ हजार ११५

साईक्स एक्स्टेंशन कोल्हापूर शाखा : ११ लाख ११ हजार ११४

४६ ठेवीदारांना गंडा

मूळच्या कणकवली व नंतर कुडाळ शाखेचे शाखाधिकारी सोनार यांनी ४६ ठेवीदारांच्या ठेव खात्यावरील जमा रकमा संबंधित ठेवीदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यातून तब्बल ८८ लाख ७० हजार रुपये उचलल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय तिघा कर्जदारांनी कर्जखात्यास भरणा केलेल्या रकमा त्या कर्ज खात्यास न भरता त्या पैशाचा अपहार केला आहे.

Web Title: Audit reveals Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.