औरंगाबाद, नांदेड विद्यापीठासह दहा संघ पुढील फेरीत-विद्युतझोतात रंगला अकरा सामन्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:52 PM2018-11-27T16:52:43+5:302018-11-27T17:00:21+5:30

प्रतिस्पर्धी संघांना नमवून औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठासह दहा संघांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील पुढील फेरी मंगळवारी गाठली. त्यातील चार संघांना पुढे चाल मिळाली.

 Aurangabad, Nanded University with ten teams in the next round- Eleven matches thrash | औरंगाबाद, नांदेड विद्यापीठासह दहा संघ पुढील फेरीत-विद्युतझोतात रंगला अकरा सामन्यांचा थरार

औरंगाबाद, नांदेड विद्यापीठासह दहा संघ पुढील फेरीत-विद्युतझोतात रंगला अकरा सामन्यांचा थरार

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा; चार संघांना पुढे चाल

कोल्हापूर : प्रतिस्पर्धी संघांना नमवून औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठासह दहा संघांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील पुढील फेरी मंगळवारी गाठली. त्यातील चार संघांना पुढे चाल मिळाली. शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात या स्पर्धा होत आहेत.

या स्पर्धेत मंगळवारी सकाळच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मणिपाल विद्यापीठावर ६३-०६ अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने गुजरात विद्यापीठावर ४१-१२ अशा गुणांनी मात केली. अन्य निकाल असा : वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ विजयी विरूद्ध (वि. वि.) गांधीनगरचे स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठ (४१-३८), एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक (५६-३१), मोहनलाल सुखोडिया विद्यापीठ, उदयपूर वि.वि. राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर (५८-१९), गोवा विद्यापीठ, पणजी वि.वि. पॅसिफिक अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन एन्ड रिसर्च, उदयपूर (४१-३०), हेमचंद्र उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण (गुजरात) वि.वि. सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर, गुजरात (३५-२६), राजस्थान विद्यापीठ, जयपूर वि.वि. महाराज गंगासिंह विद्यापीठ, बिकानेर (४२-४०). दरम्यान, मध्यप्रदेशमधील महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ (छत्रपूर), सौराष्ट्र विद्यापीठ (राजकोट), महाराज सूरजमल ब्रिज विश्वविद्यालय विद्यापीठ(भरतपूर), राजीव गांधी विद्यापीठ( भोपाळ) या संघांना पुढे चाल मिळाली.

विद्युतझोतात रंगला अकरा सामन्यांचा थरार
या स्पर्धेच्या उदघाटनानंतर काल (सोमवारी) अकरा सामन्यांमध्ये कबड्डीचा थरार रंगला. त्यामध्ये भारती विद्यापीठ (पुणे), गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ(अहमदाबाद), देवी अहिल्या विद्यापीठ(इंदोर), कोटा विद्यापीठ (कोटा), भूपाल नोबल विद्यापीठ (राजस्थान), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली), बरकतुल्ला विद्यापीठ (भोपाळ), विक्रम विद्यापीठ (उज्जैन), गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), पारुल विद्यापीठ (गुजरात), राणी दुर्गावती विद्यापीठ (जबलपूर) यांनी संघांनी विजय मिळविला.

फोटो (२७११२०१८-कोल-कबड्डी (गोवा उदयपूर), ०१ : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत गोवा विद्यापीठाने उदयपूरच्या पॅसिफिक अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन एन्ड रिसर्चवर अकरा गुणांनी विजय मिळविला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२७११२०१८-कोल-कबड्डी (जयपूर राजस्थान), ०१ : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील राजस्थान विद्यापीठ जयपूर आणि महाराज गंगासिंह विद्यापीठ बिकानेर यांच्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण. (छाया : नसीर अत्तार)
 

Web Title:  Aurangabad, Nanded University with ten teams in the next round- Eleven matches thrash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.