नाटकं सांगायची न्हाईत, गपगुमान लग्नाला यायचं, अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:46 PM2022-11-22T15:46:20+5:302022-11-22T15:46:47+5:30

कोल्हापुराच्या पेठेत बोलल्या जाणाऱ्या या अस्सल भाषेतील पत्रिकेतील रांगडी भाषा मात्र हक्काने, आपुलकीने आग्रह करणारी आहे यात शंका नाही.

Authentic Kolhapuri language wedding card viral | नाटकं सांगायची न्हाईत, गपगुमान लग्नाला यायचं, अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल

नाटकं सांगायची न्हाईत, गपगुमान लग्नाला यायचं, अस्सल कोल्हापुरी भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल

googlenewsNext

कोल्हापूर : कट्ट्यावरच्या आकडी दुधासाठी, गोड गुळमाट गुळासाठी, कुस्तीसाठी आणि पायताणासाठी प्रसिध्द असलेलं कोल्हापूर रांगड्या भाषेसाठीही प्रसिध्द आहे. याच रांगड्या भाषेतून पाचगावच्या सुमित पाटील यानं लग्नाची पत्रिका तयार केली आणि ती बघता बघता देश-विदेशात जिथं मराठी माणूस तिथं ‘व्हायरल’ही झाली.

सुमित हा आर जे, निवेदक म्हणून काम करतो. कोल्हापुरी भाषेचा वापर तो बक्कळ करतो. त्याचं श्वेताशी लग्न ठरलं. मग ‘काकाच्या लग्नाला यायचं हं’ अशी पारंपरिक पत्रिका त्यांन पैपाहुण्यांसाठी काढली. पण त्याला एक पत्रिका जगावेगळी काढायची होती. ती त्यानं फक्त डिजिटलसाठी काढली. तीही कोल्हापुरी भाषेत. त्याला जयसिंगपूरच्या श्रीजीवन ग्राफिक्सनं सहकार्य केलं आणि पत्रिकेचा विषयच हार्ड झाला.

ही पत्रिका अशी. “लग्नाचं निमंत्रण द्यालोय... यायलाच लागतंय” २६ नोव्हेंबर ला म्हणजेच शनवारी ४ वाजता साखरपुडा हाय आणि सांच्याला ७ वाजता हळदी.. डीजे तेन सांगिटलाय. लोळून नाचूया.. तुम्ही फक्त वेळ काढून या.. २७ नोव्हेंबरला म्हणजे रव्वारी १ वाजून ३ मिंटाचा मुहूर्त काढलाय भडजीनं लग्नाचा. नाटकं सांगायची न्हाईत. गपगुमान यायचं. खर्च बी ढीग केलाय त्यामुळं इषयच न्हाई. जेवणा बिवनाची सोय हाय.. पत्ता माहित्या न्हवं ? पद्मपरी हॉल कळंब्यातला.. कत्यानीला जाताना ओ.. हा तिथंच हाय लगीन.. या बघा १०० टक्के वाट बघतो. आहेर काय आणू नका...कोल्हापुराच्या पेठेत बोलल्या जाणाऱ्या या अस्सल भाषेतील पत्रिकेतील रांगडी भाषा मात्र हक्काने, आपुलकीने आग्रह करणारी आहे यात शंका नाही.

Web Title: Authentic Kolhapuri language wedding card viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.