कोल्हापुरात बसणार स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:53+5:302021-06-06T04:17:53+5:30

कोल्हापूर : शहरात तीन ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणेची केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ...

Automatic air quality checking machine to be installed in Kolhapur | कोल्हापुरात बसणार स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्र

कोल्हापुरात बसणार स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्र

Next

कोल्हापूर : शहरात तीन ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणेची केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्यास मंजुरी मिळाली आहे. सायबर चौकातील शिवाजी विद्यापीठ, ताराबाई पार्कातील सिंचन भवन, फुलेवाडीतील महापालिकेच्या जागेत ही यंत्रणा बसवण्यात येईल. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन प्रयत्नशील आहे.

देशातील १०८ शहरांत आणि महाराष्ट्रातील १७ सर्वाधिक प्रदूषित शहरांत कोल्हापूर शहराचा समावेश आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने हवा प्रदूषणात भरच पडत आहे. याशिवाय धूलीकण, सल्फरडाय ऑक्सिजनसह इतर घटकांचेही प्रदूषण होत आहे. म्हणून राष्ट्रीय हरीत लवादाने प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळास दिल्या आहेत. यानुसार रियल टाइम हवा प्रदूषणाची माहिती संकलित करण्यासाठी यंत्रणा बसवण्यासाठी ‘प्रदूषण’ने पुढाकार घेतला. सद्या शिवाजी विद्यापीठच्या पर्यावरणशास्त्र विभागाकडून हवा प्रदूषणाचा अहवाल मॅन्युअल पद्धतीने तयार केला जातो. यामध्ये रियल टाइम माहिती मिळत नाही, त्यामुळे महापालिकेस हवा प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करण्यावर मर्यादा येतात. म्हणून स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्राची यंत्रणाचे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव येथील प्रदूषण नियंत्रण प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठवला. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर एका केंद्रासाठी आवश्यक १० बाय १५ जागेचा शोध घेण्यात आला. सायबर चौकातील केंद्रासाठी इतकी जागा शिवाजी विद्यापीठाने तर सिंचन भवनातील केंद्रासाठी पाटबंधारे प्रशासनाने देण्याचे मान्य केले आहे. फुलेवाडीतील केंद्रासाठी महापालिकेच्या जागेची गरज आहे. महापालिकेकडून नाहरकत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चौकट

येथे आहेत मॅन्युअल केंद्रे

शहरातील पाच हवा प्रदूषण मापन यंत्रणेद्वारे मॅन्युअल पद्धतीने हवेतील प्रदूषणाचे प्रमाण शोधले जाते. अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ, दाभोळकर कॉर्नर, सीबीएस स्टँड येथे केंद्रे आहेत. या केंद्रावर शिवाजी विद्यापीठ पर्यावरण शास्त्र विभागाचे नियंत्रण आहे. ही केंद्रे मॅन्युअल असल्याने अहवाल येण्यास विलंब लागतो.

चौकट

जनतेलाही पाहण्यासाठी खुला

स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणेतून संकलित माहिती जनतेलाही सहजपणे पाहण्यासाठी खुली असेल. केंद्राच्या ठिकाणी स्क्रीनवर शहरातील विविध ठिकाणाचे हवेतील प्रदूषणकारी घटक डिस्प्ले होईल. ते पाहून श्वसन विकार असलेले लोकांना हवा प्रदूषणाच्या ठिकाणी प्रवास करणे टाळणे शक्य होईल.

कोट

महापालिकेच्या मदतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ शहरात हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून रियल टाईम हवा प्रदूषणाची माहिती संकलित करण्यासाठी शहरातील तीन ठिकाणी अत्याधुनिक अशा स्वयंचलित हवा गुणवत्ता तपासणी यंत्राची केंद्रे उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली आहे. त्यांना मंजुरीही मिळाली आहे.

- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: Automatic air quality checking machine to be installed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.