राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचे आधुनिकीकरण गरजेचे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:16 PM2022-04-18T12:16:45+5:302022-04-18T12:17:55+5:30
धरणाच्या सातही दरवाजांना ७० वर्ष पूर्ण झाले असून. या सातही दरवाजांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. पण या गोष्टीला या आधीही शाहूप्रेमींन मधून प्रचंड विरोध झाला होता.
राधानगरी : मुख्य अभियंता हनुमंत गुणाले जलसंपदा विभाग पुणे यांनी राधानगरीधरणास भेट देऊन धरणाच्या चालू असलेल्या स्वयंचलित दरवाजांच्या कामाची पाहणी केली. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावे अशा सूचना दिल्या. धरणाच्या सातही दरवाजांना ७० वर्ष पूर्ण झाले असून. या सातही दरवाजांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. पण या गोष्टीला या आधीही शाहूप्रेमींन मधून प्रचंड विरोध झाला होता.
काळा नुसार धरणाच्या सुरक्षतेसाठी आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. आणि याला पर्याय म्हणून वक्र दरवाजे बसवावे लागतील. हे वक्र दरवाजे बसवण्याचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्य अभियंता गुणाले यांनी दिले आहेत. तसेच धरणाच्या सेवा धोरणालाही भेट दिली. धरणाच्या मुख्य दरवाजे यांचा वयोरोप ने वापर केला जातो. त्याऐवजी हायड्रोलिक सिस्टीम ऑपरेट करा. याचा प्रस्ताव यांत्रिक विभागाकडून मुख्य अभियंता नाशिक यांच्याकडे जाहीर झाला आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे.
त्याचबरोबर मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी धरण पायथ्याशी असणाऱ्या विद्युत गृहाला ही भेट दिली. राधानगरी धरण परिसर हे ऐतिहासिक स्थळ आहे. हे स्थळ पर्यटनदृष्ट्या विकास होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करा असे आदेश मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी केले आहेत. स्वयंचलित दरवाजे असणारे राधानगरी धरण हे महाराष्ट्रातील एकमेव धरण आहे. आणि हेच स्वयंचलित दरवाजे बदलण्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. पण मुख्य दरवाजांना हायड्रोलिक सिस्टीम ऑपरेट करून पूर नियंत्रण करणे शक्य झाले, तर नवीन दरवाजे बसवण्याची ही गरज भासणार नाही.