‘डीकेटीई’ला स्वायत्त दर्जा
By Admin | Published: June 19, 2016 01:57 AM2016-06-19T01:57:15+5:302016-06-19T01:57:15+5:30
कल्लाप्पाण्णा आवाडे यांची माहिती
इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या टेक्स्टाईल व इंजिनिअरिंग महाविद्यालयाला (डीकेटीई) विद्यापीठ अनुदान आयोग व शिवाजी विद्यापीठ यांनी शैक्षणिक स्वायत्तता बहाल करून ‘स्वायत्त अभियांत्रिकी कॉलेज’, असे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे ‘डीकेटीई’कडील सर्व अभ्यासक्रम स्वायत्त झाल्याने शिक्षणाचा एक वेगळा दर्जा व वैशिष्ट्यपूर्ण अध्याय सुरू झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
१९८२ मध्ये महाराष्ट्रातील पहिले विनाअनुदानित वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमाने सुरुवात झालेली ‘डीकेटीई’ आता अभियांत्रिकी व अन्य चार शाखांमध्ये शिक्षण देणारी यशस्वी संस्था म्हणून सर्वदूर परिचित झाली आहे, असे सांगून आवाडे म्हणाले, गेल्या तीन दशकांनंतर डीकेटीईमध्ये पदविकापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. वस्त्रोद्योगामध्ये पाच पदवी व तीन पदव्युत्तर, तर अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, (पान १० वर)