तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:55+5:302020-12-25T04:20:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, वारणानगर : देशातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस ...
लोकमत न्यूज नेटवर्क, वारणानगर : देशातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस (स्वायत्त) संस्थेचा दर्जा मिळाल्याची माहिती वारणा शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. युजीसी (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्याकडूनही कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता मिळाली असून देशाच्या पातळीवरील सर्वोच्च असा हा दर्जा वारणेस मिळाल्याचे कोरे यांनी सांगितले. यावेळी वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, कोरे अभियांत्रिकी प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर उपस्थित होते. डॉ. कोरे याविषयी माहिती देताना म्हणाले की, स्वायत्त महाविद्यालय झाल्यानंतरसुद्धा पदवी व पदव्युत्तर प्रवेश नियमांनुसारच होणार आहे. स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे आता महाविद्यालयाला इंडस्ट्री ओरिएंटेड अभ्यासक्रम तयार करता येणार असून आणखीन नवनवीन अभ्यासक्रम, कोर्सेस सुरू करता येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले असून स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालय स्वतः परीक्षा घेऊन त्याचा निकालही जाहीर करेल, नजीकच्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या दृष्टीने अभियांत्रिकी महाविद्यालय काम करेल, असे कोरे यांनी सांगत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक आणि संस्थांच्याबरोबर सामंजस्य करार, चॉईस बेस्ट कॅडेट सिस्टम आणि क्रेडिट कोर्स यावर भर तसेच पायाभूत सुविधा देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न राहील. जागतिक पातळीवर स्पर्धा करणारे हे सर्व अभ्यासक्रम असतील नजीकच्या काळात वारणा-विद्यापीठ व्हावे हे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहनही अध्यक्ष कोरे यांनी केले.
यावेळी डॉ. बी. टी. साळोखे, प्रा. एस. ए. देसाई, प्रा. एस. टी. पाटील, प्रा. जीवनकुमार शिंदे, रजिस्ट्रार डी. एस. ठोंबरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
फोटो -