करवीर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:37+5:302021-03-13T04:45:37+5:30

कसबा बावडा : करवीर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे अविनाश कृष्णात पाटील (वाकरे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

Avinash Patil as the Deputy Chairman of Karveer Panchayat Samiti | करवीर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अविनाश पाटील

करवीर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अविनाश पाटील

Next

कसबा बावडा : करवीर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे अविनाश कृष्णात पाटील (वाकरे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे- भामरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायतच्या सभागृहात ही निवड झाली. यावेळी सभापती मीनाक्षी पाटील, करवीर पंचायतचे गटविकास अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते. निवड जाहीर होताच पाटील गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला.

विद्यमान उपसभापती सुनील पोवार यांनी, नेत्यांनी ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद तीन आठवडे रिक्त होते. उपसभापती पदासाठी अविनाश पाटील यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांच्याहस्ते नूतन उपसभापती पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

करवीर पंचायत समितीवर पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. एका गटाला सभापतीपदाची, तर दुसऱ्या गटाला उपसभापती पदाची संधी दिली जाते. नूतन उपसभापती पाटील हे आमदार पी. एन. पाटील गटाचे आहेत. तसेच ते कुंभी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व युनियन प्रतिनिधी आहेत.

या निवडीवेळी श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, कृष्णात धोत्रे, तसेच पंचायतचे सदस्य, सदस्या तसेच वाकरे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:

सर्वांना बरोबर घेऊन काम करू....

आमदार पी. एन. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे आपणास उपसभापती पदाची संधी मिळाली. पंचायतीचा कारभार करताना सर्व सदस्य, सदस्या यांना बरोबर घेऊन काम करून पंचायतीचा नावलौकिक करू.

- अविनाश पाटील

नूतन उपसभापती, करवीर पंचायत.

१)अविनाश पाटील ( आय कार्ड साईज फोटो )

२) निवड जाहीर होताच उपसभापती अविनाश पाटील यांना समर्थकांनी असे उचलून घेऊन आनंद व्यक्त केला.

(फोटो:रमेश पाटील,कसबा बावडा )

..................................................

Web Title: Avinash Patil as the Deputy Chairman of Karveer Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.