कर्जमाफी टाळण्यासाठीच आॅनलाईनचे नाटक: शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:42 PM2017-08-25T23:42:16+5:302017-08-25T23:44:30+5:30
तुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुरंबे (जि.कोल्हापूर) : शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर राज्य सरकारने कजर्माफीची घोषणा केली. मात्र, त्यासाठी अनेक निकष लावले. निकषांत पकडून कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या आॅनलाईन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करीत आहे, असी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.
तुरंबे (ता राधानगरी) झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारला शेतकºयांचा जसा विसर पडला आहे, तीच अवस्था राज्याची आहे. राज्यातील ४८ पैकी ४२ खासदार केंद्र सरकारबरोबर आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत.
शेती उत्पादनाच्या दीडपट हमीभाव व सातबारा कोरा करण्यासाठी आता यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. म्हणूनच येत्या १0 नोव्हेंबरला दिल्ली येथील जंतरमंतर याठिकाणी देशातील १६८ संघटना एकत्र करून १0 लाख शेतकºयांना घेऊन आंदोलन करणार आहे. यानंतर तरी सातबारा कोरा होईल, अशी आशा आहे, अशा शासकांना आता वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणारनाही.
आयात का वाढविता?
यापूर्वीचे कोंग्रेस सरकार देशात सर्व काही पिकत असतानाही २८ हजार कोटींच्या शेतीमालाची आयात करायचे. मात्र, मोदी सरकार एक लाख ४0 हजार कोटींची आयात करते ? मग शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल? शेतीप्रधान असणाºया आपल्या देशात बाहेरील शेतीमाल आयात कशासाठी होतो ?
शेतकºयांचा विश्वासघातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होते; परंतु विश्वासघात करून गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने जी धोरणे राबविली. त्यामुळे शेतकºयांवर वाईट वेळ आली आहे. जर शेतकरी वर्गाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २0१९ च्या निवडणुकीत तुमचे स्थान जनता ठरविल असेही शेट्टी म्हणाले.
तेल अण् केस
मी कोल्हापुरातून येताना सभेला उपस्थित असलेल्यांना खोबरेल तेलाच्या बाटल्या आणल्या आहेत. मात्र, अट अशी आहे की, ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही त्याला तेल मिळेल. कानावरही केस असू नयेत, तशी या राज्य शासनाची अवस्था आहे.