थर्टी फर्स्टचा खर्च टाळून दिला जनावरांना चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:47+5:302021-01-02T04:20:47+5:30
चिखली येथील सरदार तरुण मंडळ रूबाब ग्रुप आणि शिवांजनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंटामुक्त समिती अध्यक्ष बळवंत कळके आणि ...
चिखली येथील सरदार तरुण मंडळ रूबाब ग्रुप आणि शिवांजनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंटामुक्त समिती अध्यक्ष बळवंत कळके आणि शिवांजनी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षापासून थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पांजरपोळ येथील जनावरांना चारा देण्याचा विधायक उपक्रम राबवला जातो. थर्टीफर्स्ट वर होणारा अनाठायी खर्च वाचवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम या वर्षीही राबवला. प्रयाग चिखली येथून एक ट्रॉली चारा श्रमदानातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केला व पांजरपोळ येथील जनावरांसाठी पोहोच केला. या विधायक उपक्रमांसाठी मंडळाचे मार्गदर्शक बळवंत फडके, अजित पवार, भूषण पाटील, मंदार चौगुले, लक्ष्मण चव्हाण, राजीव पाटील, रोहित लोहार, अजित गुरव ,अवधूत पाटील, किरण सुतार अजित पाटील, शुभम पाटील, प्रथमेश वाठारकर, पवन मांगलेकर, आशिष निकम, नितीन लोहार, सागर चौगले, हर्षद लोहार, विनायक कळके , नयन चव्हाण, चेतन पाटील, अक्षय चौगले, अमित पवार, रोहित पाटील, आदी कार्यकर्त्यांनी या परिश्रम घेतले.