‘राष्ट्रवादी’तून आवाडे यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:59 AM2018-08-17T00:59:35+5:302018-08-17T00:59:39+5:30

Awade talk about the name of 'NCP' | ‘राष्ट्रवादी’तून आवाडे यांच्या नावाची चर्चा

‘राष्ट्रवादी’तून आवाडे यांच्या नावाची चर्चा

googlenewsNext

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार व काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध व काँग्रेसमध्ये आता कोणच ‘गॉडफादर’ राहिले नसल्याच्या कारणावरून आवाडे यांनी हा पर्याय निवडला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून, त्या प्रयत्नाचांच हा भाग असल्याचे मानण्यात येते.
गेल्याच पंधरवड्यात काँग्रेसअंतर्गत जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी असलेले राजकीय वैर आवाडे कुटुंबीयांनी संपुष्टात आणले व हातात हात घेऊन काँग्रेस मजबूत करण्याची ग्वाही दिली. आवाडे घराणे आजपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे व त्या पक्षानेही त्यांना आजपर्यंत सत्तेची भरपूर संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होतानाच ते त्या पक्षात जातील असे होरा होता; परंतु त्यावेळी त्यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला; तथापि आजपर्यंतच्या वाटचालीत पवार यांची आवाडे यांच्या ताब्यातील संस्थांच्या अडीअडचणीवेळी खूप मदत झाली आहे. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांना अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघावरही पवार यांच्यामुळेच संधी मिळाली होती.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याचा हातकणंगले मतदारसंघ आवाडे यांच्यासाठी पवार यांनीच सोडला व त्यांना विजयी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. या सर्व प्रक्रियेत आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती.
आता त्यांच्याकडेच पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी काही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनच प्रकाश आवाडे यांचे नाव विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून पुढे आले आहे.
इचलकरंजीत राष्ट्रवादीत मदन कारंडे व माजी आमदार अशोक जांभळे असे दोन गट आहेत. त्यांना पक्षाने आपल्याला ही जागा लढवायची असल्याने बूथ कमिट्यांची रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवार कोण असेल हे सांगितलेले नाही.
स्थानिक राजकारणात आवाडे व कारंडे गट यांच्यात टोकाचे
वितुष्ट आहे, हेदेखील नाकारता येत नाही.

पाच जागांचा आग्रह
राष्ट्रवादीने जिल्ह्यातील कागल-गडहिंग्लज, चंदगड-आजरा, राधानगरी-भुदरगड हे हक्काचे तीन मतदारसंघ व त्याचबरोबर शिरोळ आणि इचलकरंजी असे पाच मतदारसंघ लढविण्याची तयारी केली आहे. इचलकरंजीत आवाडे गट काँग्रेससोबतच राहिला तर कोल्हापूर उत्तरच्या जागेवरही हा पक्ष दावा करू शकतो; परंतु ‘उत्तर’मध्ये पक्षाकडे ताकदीने लढण्यासाठी उमेदवार नाही. त्यामुळे इचलकरंजीवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने कार्याध्यक्षपदी राजेंद्र यड्रावकर यांना संधी दिली, त्यामागेही विधानसभेचेच राजकारण आहे.

Web Title: Awade talk about the name of 'NCP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.