राहुल पाटील यांच्या अध्यक्षपदाला आवाडेंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:46 AM2021-02-06T04:46:11+5:302021-02-06T04:46:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आ. पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित ...

Awade's support for Rahul Patil's presidency | राहुल पाटील यांच्या अध्यक्षपदाला आवाडेंचा पाठिंबा

राहुल पाटील यांच्या अध्यक्षपदाला आवाडेंचा पाठिंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आ. पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित होत असेल तर आपल्या ताराराणी आघाडीच्या दोन सदस्यांचा त्यांना बिनशर्त पाठिंबा राहील अशी भूमिका आ. प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी घेतली आहे. राज्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या आवाडे यांनी ही भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाची प्रक्रिया सुरू होणार आहे. अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सुरुवातीपासून राहुल पाटील यांचे नाव चर्चेत नव्हते. मात्र, त्यांनी दाखला काढला असल्यानेच आ. पाटील यांनी राहुल यांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन राहुल पाटील यांना अध्यक्षपदासाठी पाठिंब्याची मागणी केली. आता आ. आवाडे यांनी त्यांचे समर्थक राजू मगदूम यांच्यामार्फत हा पाठिंबा जाहीर केल्याने दिवसभर याची चर्चा सुरू होती. भूतकाळात आवाडे-पीएन पाटील यांच्यात राजकीय संघर्ष झाला. गेल्या निवडणुकीत आवाडे यांनी काँग्रेस सोडून अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला व भाजपला पाठिंबा जाहीर केला. असे असताना जिल्हा परिषदेत राहुल यांना आवाडे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर माणगावचे माजी उपसरपंच राजू मगदूम यांनी आवाडे यांची ही भूमिका जाहीर केली आहे.

चौकट

गोकुळ, जिल्हा बँकेचाही संदर्भ

काही दिवसांतच गाेकुळ आणि जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. राहुल पाटील यांना हा पाठिंबा जाहीर करताना या दोन्ही निवडणुकांचाही संदर्भ असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Awade's support for Rahul Patil's presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.