दिनकरावांचे अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:27 AM2021-01-16T04:27:49+5:302021-01-16T04:27:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ आणे : निवडणुकीत विकासकामाच्या आरोप-प्रत्यारोपापेक्षा पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील निवडणूक करणी आणि भानामतीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ आणे : निवडणुकीत विकासकामाच्या आरोप-प्रत्यारोपापेक्षा पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील निवडणूक करणी आणि भानामतीच्या प्रकाराने चांगली चर्चेत आली. उमेदवाराच्या दारापासून ते वेशीपर्यंत भानामती नाना प्रकार अनुभवायला मिळाले. एक उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोणा करतो तर माझ्या गावातील ३५ उमेदवार निवडून यावेत यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पन्हाळा तालुका उपाध्यक्ष दिनकर कृष्णा चौगुले यांनी दुचाकीवरून भानामतीसाठी वापरले जाणारे साहित्य लावून भानामती करणाऱ्यांची चांगलीच खिल्ली उडवली.
तुम्ही आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी अंधाऱ्या रात्री करणी करता तर गावातील ३५ उमेदवारांना गुलाल लागावा म्हणून साऱ्या गावातून करणीचा उतारा फिरवला. लोक करणी रात्री-अपरात्री करतात; पण कुणाची तमा पर्वा न करता दिवसाढवळ्या अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करून करणीवर अवलंबून असणाऱ्या उमेदवारांना तोंडात बोटे घालायला लावले.
पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे करणी, भानामती जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधन करताना दिनकर चौगुले आणि मुलगी रोहणी.