जागृती यात्रेने सरकारला हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:51 AM2018-03-26T00:51:14+5:302018-03-26T00:51:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्रातील सरकार नकारात्मक असून, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील संघर्ष कायम राहील. शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या माध्यमातून ३६ जिल्ह्यांतील ५३० सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टÑ ढवळून काढणार असून, शेतकºयांच्या यात्रेने सरकारला हादरे बसतील, असा इशारा शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे नेते किशोर ढमाले यांनी दिला.
शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेची सुरुवात शुक्रवारी (दि. २३) सांगली जिल्ह्यातून झाली असून, रविवारी ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात आली. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रतिभानगर येथील हुतात्मा स्तंभास महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. ढमाले म्हणाले, गोºया इंग्रजांच्या ११९ वर्षांच्या काळात जेवढी माणसे मारली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे स्वातंत्र्यानंतर सरकारच्या गोळीबारात मृत्युमुखी पडली. या विरोधात सर्व संघटनांनी मोट बांधली असून, जागृती यात्रेच्या माध्यमातून शेतकºयांमधून उठाव करणार आहोत. ३० एप्रिलला संपूर्ण महाराष्टÑात जेल भरो आंदोलन करणार आहोत.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, माजी आमदार संपतराव पवार, नामदेव गावडे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, महापौर स्वाती यवलुजे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कालिदास आपटे, उमा पानसरे, बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, अॅड. माणिक शिंदे, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.
दूध संघांकडून ४५ हजार कोटी वसूल
गाईच्या दुधाला किमान २७ रुपये हमीभाव देण्याचे आदेश सरकारने काढले; पण एकाही संघाने त्याचे पालन केले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून संघाकडूनच साडेचार हजार कोटी सरकारने वसूल केल्याचा आरोप ढमाले यांनी केला.