लॉकडाऊनमध्ये ३३ दिवस ३३ व्याख्याने; मुस्लिम अधिकारतर्फे विचारांचा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 01:38 PM2020-05-24T13:38:13+5:302020-05-24T13:40:00+5:30
दहावी, बारावीनंतर पुढे काय? (प्रा. डॉ. के. जी.पठाण), सद्य परिस्थितीतील आव्हाने व मुस्लिम तरुण (डॉ. सूरज चौगुले), मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्या व त्यावरील उपाय. (माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण) आदींनी आपले विचार मांडले.
सांगली : कोरोनामुळे सुरू झालेला लॉकडाऊन व त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मुस्लिम अधिकार आंदोलनतर्फे गेल्या महिन्याभरापासून वैचारिक मंथन राबविले आहे. झूम अॅपव्दारे ह्यआॅनलाईन अभ्यास वर्गाह्णच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील अडीअडचणी, त्यावरील उपाय व समाजासमोरील आव्हाने यावर राज्यभरातील तज्ज्ञ मंडळी आपले विचार मांडत आहेत. गेल्या ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात खासदार हुसेन दलवाई, तुषार गांधी, श्रीमंत कोकाटे आदींनी मार्गदर्शन केले.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे हतबल न होता या कालावधित समाजातील प्रश्नांवर व भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी २२ एप्रिलपासून मुस्लिम अधिकार आंदोलन, महाराष्ट्र या संघटनेमार्फत रोज दुपारी साडेचार वाजता ह्यआॅनलाईन सामाजिक अभ्यास वर्गह्ण सुरू करण्यात आला होता. झूम अॅपद्वारे हे वेबीनार होत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक यात सहभागी होत होते. सुहेल सय्यद, जिशान पटेल, रमीज मणेर, सरताज तांबोळी व मुनीर मुल्ला याांनी या अभ्यास वर्गाचे संयोजन केले.
३३ दिवस चाललेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होत आपले विचार मांडले. यात मुस्लिमांची सामाजिक स्थिती व राजकारण (खासदार हुसेन दलवाई), हिंदू-मुस्लिम ऐक्य व सर्वधर्मसमभाव (तुषार गांधी), विषमतेविरुद्ध इस्लामचा विद्रोह (कॉम्रेड धनाजी गुरव), भारतीय मुस्लिम समज-गैरसमज व अपेक्षा (श्रीमंत कोकाटे), भारतीय मुस्लिमांची सत्यपरिस्थिती व त्यांचा इतिहास (सरफराज अहमद), सच्चर रिपोर्ट व भारतीय मुसलमानांचे प्रश्न (सुभाष वारे),भारतीय मुस्लिम सुफी संतांची सामाजिक चळवळ (जावेद पाशा कुरेशी), समाज व्यवस्थेसाठी मोहंमद पैगंबर यांचे योगदान (डॉ. सुहास फडतरे महाराज (कीर्तनकार), दहावी, बारावीनंतर पुढे काय? (प्रा. डॉ. के. जी.पठाण), सद्य परिस्थितीतील आव्हाने व मुस्लिम तरुण (डॉ. सूरज चौगुले), मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्या व त्यावरील उपाय. (माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण) आदींनी आपले विचार मांडले.
मुस्लिम समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. भविष्यातील बदलत्या घडामोडींबरोबरच येणाºया आव्हानांचा सामना करण्यासाठी वैचारिक मंथन आवश्यक होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय ज्येष्ठ तज्ज्ञांच्या सहभागामुळे वेबीनारचा उद्देश सफल झाला आहे.
मुनीर मुल्ला, अध्यक्ष मुस्लिम अधिकार आंदोलन