पुरस्काराने शिक्षकांना बळ : जयंत आसगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:29+5:302021-09-06T04:28:29+5:30

शिरोळ : प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नाही. शिक्षणाबरोबर समाज श्रेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन ...

The award empowers teachers: Jayant Asgavkar | पुरस्काराने शिक्षकांना बळ : जयंत आसगावकर

पुरस्काराने शिक्षकांना बळ : जयंत आसगावकर

Next

शिरोळ : प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नाही. शिक्षणाबरोबर समाज श्रेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन रोटरी क्लब शिरोळने आणखी बळ दिले आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.

रोटरी क्लब आॅफ शिरोळ यांच्या वतीने शैक्षणिक श्रेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना स्व. बी. ए. माणगांवे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. टारे क्लब हाऊस येथे कार्यक्रम झाला. आमदार आसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी रोटेरीचे डीजीई नासिर बोरसादवाला होते. याप्रसंगी जि. प. च्या शिक्षण सभापती रसिका पाटील, दलितमित्र जि.प.सदस्य डॉ. अशोकराव माने, उद्योजक भरत माणगांवे, गटशिक्षणाधिकारी दिपक कामत, रुस्तुम मुजावर, डॉ. सुहास जोशी, डॉ. हिदूराव संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक ढवळे तर स्वागत चितांमणी गोंदकर यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती किशोर शिंदे, रूपाली भगाटे, वैशाली बोरचाटे, गुलनाझ बागवान, दत्तात्रय गायकवाड, सहदेव केंगाळे, सुशांत आंबी, भरत सावळवाडे, सुवर्णा जाधव, श्रीशैल्य मठपती, सचिन पाटील यांना नेशन बिल्डर अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

रोटरी क्लबला पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी अध्यक्ष पंडित काळे व सुरेश पाटील यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अविनाश टारे, बापूसो गंगधर, श्रीकांत शिरगुप्पे, शरद चुडमुंगे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. सचिव सचिन देशमुख यांनी आभार मानले.

फोटो - ०५०९२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - शिरोळ येथे रोटरी क्लबच्यावतीने शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: The award empowers teachers: Jayant Asgavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.