विजयालक्ष्मी ट्रस्टमार्फत लुईस ग्यो यांना पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:48+5:302021-09-06T04:27:48+5:30

विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिल्प सागर अकॅडमी यांच्यामार्फत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३२ शाळांमधील उत्कृष्ट शिक्षक आणि प्राचार्यांचा सन्मानचिन्ह आणि ...

Award to Louise Gyo by Vijayalakshmi Trust | विजयालक्ष्मी ट्रस्टमार्फत लुईस ग्यो यांना पारितोषिक

विजयालक्ष्मी ट्रस्टमार्फत लुईस ग्यो यांना पारितोषिक

Next

विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिल्प सागर अकॅडमी यांच्यामार्फत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३२ शाळांमधील उत्कृष्ट शिक्षक आणि प्राचार्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला अधीक्षक शिवराज बंडोपंत नाईकवडे, अरुण नरके फौंडेशनच्या संचालक स्निग्धा चेतन नरके अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, कोल्हापूरच चॅप्टरचे चेअरमन विजय कोरोणे, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सस्मिता मोहंती उपस्थित होते. आर्किटेक्ट श्रुती भागवत यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमात डॉ. लुईस ग्यो यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे संयोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सरनाईक, विश्वस्त सुनील गाताडे, शिल्प सागर अकॅडमीच्या संचालक स्वाती सरनाईक यांनी केले.

-----------------------

फोटो ओळ : 05092021-Kol-vijyalaxmi charitabal trust(Teachers day).jpg

फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी शिक्षक दिनानिमित्त विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिल्प सागर अकॅडमी यांच्यामार्फत इंग्लंडचे प्रा. डॉ. लुईस ग्यो यांना पहिले आंतरराष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले. यावेळी शशिकांत हेर्लेकर यांच्यासह रवींद्र सरनाईक, सुनील गाताडे, स्वाती सरनाईक उपस्थित होते.

(बातमीदार : संदीप आडनाईक)

050921\05kol_4_05092021_5.jpg

फोटो ओळ : कोल्हापूरात रविवारी शिक्षक दिनानिमित्त विजयालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिल्प सागर अकॅडमी यांच्यामार्फत इंग्लंडचे प्रा. डॉ. लुईस ग्यो यांना पहिले आंतरराष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले.  यावेळी शशिकांत हेर्लेकर यांच्यासह रविंद्र सरनाईक, सुनील गाताडे, स्वाती सरनाईक उपस्थित होते.

Web Title: Award to Louise Gyo by Vijayalakshmi Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.