प्रोबस क्लबकडून दिला जाणारा पुरस्कार एकत्र कुटुंबांचे अधोरेखित करणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:15+5:302021-03-10T04:26:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : आजच्या धावपळीच्या ‘मी एकटा किंवा मी एकटी’ अशा वातावरणात रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आजच्या धावपळीच्या ‘मी एकटा किंवा मी एकटी’ अशा वातावरणात रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबकडून दिला जाणारा हा पुरस्कार गृहिणी व एकत्र कुटुंबांचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे, असे उद्गार हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी काढले.
येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्यावतीने आदर्श कुटुंब व आदर्श गृहिणी पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी प्रोबस क्लबचे संस्थापक प्रकाश सातपुते, वैशाली नायकवडे व सामाजिक कार्यकर्त्या शशिकला बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनानिमित्त मंजिरी सातपुते यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदा विलासमती पाटील व वेणूताई कुडचे यांना आदर्श गृहिणी, तर मोहनराव ढवळे, बाबूलाल जोशी यांना आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार देण्यात आला.
रोटरी भवनमध्ये कोरोना नियमानुसार झालेल्या कार्यक्रमास डॉ. कुबेर मगदूम, गजानन सुलतानपुरे, महावीर कुरूंदवाडे, सूर्यकांत बिडकर, शिवबसू खोत, ऐश्वर्या सातपुते, मनोहर कुराडे आदींसह सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोदिनी देशमाने यांनी केले. संगीता लडगे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
०९०३२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्यावतीने आदर्श कुटुंब व आदर्श गृहिणी पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात झाला. यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाट, प्रकाश सातपुते, शशिकला बोरा, वैशाली नायकवडे, आदी उपस्थित होते.