अरूण पाटील यांना बांधकाम अभियंता गौरव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:45+5:302021-09-07T04:30:45+5:30
कोल्हापूर : येथील उद्योजक व निर्माण कन्स्ट्रक्शनचे संचालक अरुण भैरू पाटील यांना इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय ...
कोल्हापूर : येथील उद्योजक व निर्माण कन्स्ट्रक्शनचे संचालक अरुण भैरू पाटील यांना इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ ॲन्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थांच्या वतीने रविवारी खास समारंभामध्ये ‘बांधकाम अभियंता गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांतील अतुलनीय कार्याबद्दल हे आंतरराज्य पुरस्कार आयोजित करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी मेट्रो हायटेकचे चेअरमन सुरेश पाटील, गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावार, कर्नाटकच्या होमगार्ड विभागाचे माजी जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
अरुण पाटील यांनी विविध शासकीय प्रकल्प, गृहप्रकल्प यातून आपल्या कामाचा ठसा उमटवला असून व्यवसाय करत असताना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडो जणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रमांनाही सढळ हस्ते मदत केली आहे.
०६०९२०२१ कोल अरुण पाटील
कोल्हापुरातील निर्माण कन्स्ट्रक्शन्सचे अरुण पाटील यांना बेळगाव येथे झालेल्या समारंभात बांधकाम अभियंता गौरव पुरस्काराने माजी केंद्रीय मंत्री रत्नामाला सावनूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील, महेश मेघण्णावार, अरविंद घट्टी उपस्थित होते.