समीर देशपांडे यांना सामाजिक जाणीव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:23+5:302020-12-08T04:22:23+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक जाणीव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे ...
कोल्हापूर : ‘लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक जाणीव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथे झालेल्या समारंभामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डा. योगेश जाधव, आमदार रोहित पवार, संजय भोकरे, किरण जोशी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशपांडे यांनी कोरोनाच्या काळामध्ये सुरूवातीपासूनच जनजागृतीपर लिखाण केले. ते स्वत: पाॅझिटिव्ह आले असताना त्यांनी पाॅझिटिव्ह आल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत रुग्णालयातून मालिका लिहिली आणि ती ‘लोकमत’च्या राज्यभरातील आवृत्त्यांमधून प्रकाशित झाली. सलग तीन महिने त्यांनी कोरोनाविषयक आवश्यक माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित केले.
०७१२२०२० कोल समीर देशपांडे
कोरोनाकाळातील कामगिरीबाबत पत्रकार समीर देशपांडे यांचा पुणे येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.