पेरणोलीत मास्क वाटपाने कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:33+5:302021-04-16T04:25:33+5:30
पेरणोली (ता. आजरा) येथे कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शारीरिक अंतर, मास्कचा वापर करावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात ...
पेरणोली (ता. आजरा) येथे कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शारीरिक अंतर, मास्कचा वापर करावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात येत आहे.
हाच संदेश गावातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचावा व मास्क वापरण्यासासंबंधी नागरिकांत जागृती निर्माण व्हावी या हेतूने सम्यक-संवाद कला व सांस्कृतिक मंच, पेरणोली व माणुसकी फाउंडेशन यांच्यातर्फे गावातील नागरिकांना १५०० मास्कचे वाटप व मास्क वापरासंबंधी घरोघरी जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बौद्ध विहारात ‘पुस्तकमय भीमजयंती’ संकल्पना राबवण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित व इतर पुस्तकांचे प्रदर्शन भरवून तरुणांना या पुस्तकांविषयी माहिती देण्यात आली.
प्रा. अविनाश वर्धन, मंचचे अध्यक्ष सदशिव कांबळे, उपाध्यक्ष संदीप कांबळे, सचिव विकास कांबळे, खजिनदार तानाजी कांबळे, नीलेश कांबळे, उमेश ओव्हाळ, मसाजी कांबळे, माजी पं. स. सभापती भारती कांबळे, ग्रा. पं. सदस्य नंदा कांबळे, पोलीस पाटील दीपाली कांबळे, माजी सरपंच दिनकर कांबळे आदी उपस्थित होते.
-------------------------
* फोटो ओळी : पेरणोली (ता. आजरा) येथे मास्कचे वाटप करताना सम्यक संवादचे कार्यकर्ते संदीप कांबळे, संदीप नावलकर, विकास कांबळे, सदाशिव कांबळे, प्रभाकर कांबळे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५०४२०२१-गड-११