सखी वन स्टॉप सेंटरतर्फे महिलांमध्ये जागृती (वाणिज्य वृत्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:04+5:302021-03-14T04:22:04+5:30

आनंदीबाई महिला बहुद्देशीय संस्था इम्प्लिमेंट एजन्सीच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात विधी सल्लागार अनुराधा माणगावकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे ...

Awareness among women through Sakhi One Stop Center (Commerce News) | सखी वन स्टॉप सेंटरतर्फे महिलांमध्ये जागृती (वाणिज्य वृत्त)

सखी वन स्टॉप सेंटरतर्फे महिलांमध्ये जागृती (वाणिज्य वृत्त)

Next

आनंदीबाई महिला बहुद्देशीय संस्था इम्प्लिमेंट एजन्सीच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात विधी सल्लागार अनुराधा माणगावकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या कायद्यांची माहिती दिली.

समुपदेशक अश्विनी पाटील यांनी सखी सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला. रेश्मा वाटेगावे यांनी आरोग्य व आहाराची माहिती दिली. आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वैशाली महाडीक यांनी केंद्राची माहिती दिली. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, संजय गांधी निराधार योजना सदस्या चंदा बेलेकर, प्रज्ञा यादव, अश्विनी पारले, अस्मिता पाटील, पाचगाव ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चिले, रोहिणी घोसाळकर उपस्थित होत्या.

--

फोटो नं १३०३२०२१-कोल-सखी सेंटर

ओळ : कोल्हापुरातील सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने महिलांसाठी कायदे, आरोग्य आणि आहार या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---

Web Title: Awareness among women through Sakhi One Stop Center (Commerce News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.