बेळगावात बालकामगार विरोधी मोहिमेचा जागृती रथ, ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:38 PM2020-06-12T17:38:06+5:302020-06-12T17:41:12+5:30
जागतिक बालकामगार विरोधी दिनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती रथाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. सतिशसिंग, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी.बोमनहळ्ळी यांनी ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ केला.यावेळी पोलीस आयुक्तांसह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव : जागतिक बालकामगार विरोधी दिनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती रथाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर .जी. सतिशसिंग, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी.बोमनहळ्ळी यांनी ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ केला.यावेळी पोलीस आयुक्तांसह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन,जिल्हा पंचायत,जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण ,कामगार खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागृती रथ पंधरा जून पर्यंत जिल्ह्यात फिरून बालकामगार विरोधात जनतेत जागृती निर्माण करणार आहे.१४ ते १८ वयोगटातील मुलांना बांधकाम मजूर म्हणून कामाला घेतले तर कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाणार आहे.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त रॅली काढता येत नसल्याने जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती रथाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्या असून या समित्या बालकामगार विरोधी कार्यक्रम राबवून बालकामगार ठेवून घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे.