ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:11+5:302020-12-28T04:14:11+5:30

जयसिंगपूर : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरुन उमेदवारांचा गोंधळ सुरु आहे. ही कागदपत्रे गोळा करताना त्यांची ...

Awareness of candidates while filling online application | ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांचे जागरण

ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांचे जागरण

Next

जयसिंगपूर : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरुन उमेदवारांचा गोंधळ सुरु आहे. ही कागदपत्रे गोळा करताना त्यांची दमछाक होत आहे. सुरुवातीला शपथपत्र, स्वयंम घोषणापत्र, हमीपत्रावरुन चांगलाच गोंधळ उडाला होता. मात्र, ही कागदपत्रे साध्या कागदावर देण्याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनेकांचा गोंधळ थांबला असला तरी, ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवार रात्री जागरण करुन नोंदणी करत आहेत.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून गावा-गावात राजकीय वातावरण तापले आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याची लगबग चालू झाली आहे. नामनिर्देशनपत्र ऑनलाईन नोंदणी करताना संगणकासमोर ताटकळत बसावे लागत आहे. तसेच अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे अडचणी येत आहेत. ऑनलाईनमुळे उमेदवार मेटाकुटीला आले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली आहे.

चौकट -

नेत्यांकडून अनेकांना शब्द

काही गावांमध्ये अद्यापही उमेदवारांची ओढाताण सुरु आहे. गावपुढाऱ्यांकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे, तर काहीजणांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. नेत्यांकडून अनेकांना शब्द दिला जात असल्यामुळे ऐनवेळेस बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फोटो - २७१२२०२०-जेएवाय-०२

फोटो ओळ -

शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ऑनलाईन फॉर्म भरताना ताटकळत बसावे लागत आहे.

Web Title: Awareness of candidates while filling online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.