सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्तीबाबत शहरात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:40+5:302021-08-17T04:29:40+5:30

कोल्हापूर : ‘स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा..’ या उपक्रमांतर्गत सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्ती या विषयावर रविवारी ...

Awareness in the city about getting rid of single use plastics | सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्तीबाबत शहरात जनजागृती

सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्तीबाबत शहरात जनजागृती

Next

कोल्हापूर : ‘स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा..’ या उपक्रमांतर्गत सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्ती या विषयावर रविवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व उपआयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात जनजागृती करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, छत्रपती राजाराम चौक, भवानी मंडप, कपिलतीर्थ मार्केट, महाद्वार रोड, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी परिसरात सिंगल यूज प्लास्टिकबाबत सायकल रॅलीद्वारे तसेच शहरातील मुख्य चौकात हातामध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणारे फलक घेऊन लोकांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात आली.

वाहतूक पोलीस शाखेचे स्नेहा गिरी, शालेय विद्यार्थी, पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील रिक्षा स्टॉप, फूल विक्रेते, भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ परिसरात जनजागृती केली. यावेळी नागरिक, पोलीस कर्मचारी, भाजी व फूल विक्रेते यांना महापालिकेमार्फत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Awareness in the city about getting rid of single use plastics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.