मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 06:20 PM2020-09-30T18:20:16+5:302020-09-30T18:21:03+5:30

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

Awareness program in Corona hotspot area by mobile van | मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती कार्यक्रम

मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती कार्यक्रम

Next
ठळक मुद्देमोबाईल व्हॅनद्वारे कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती कार्यक्रमजिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रमोद खंडागळे उपस्थित होते.

कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातील लोकांचे प्रबोधन व्हावे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे आणि आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी या मोबाईल व्हॅनवरुन शाहिरी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या बरोबरच मोबाईल व्हॅनवरुन ऑडिओ क्लिपद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.

Web Title: Awareness program in Corona hotspot area by mobile van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.