वीजबिल माफीसाठी गुरुवारी जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:22 AM2021-01-04T04:22:08+5:302021-01-04T04:22:08+5:30
कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. ७) शहरासह महामार्गावरून दुचाकी ...
कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. ७) शहरासह महामार्गावरून दुचाकी रॅली काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या सर्व वाहतूकदार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष जाधव होते.
जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशन सभागृहात झालेल्या बैठकीत गुरुवारी काढण्यात येणाऱ्या रॅलीत दुचाकी, चारचाकी, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस, अशी वाहने सहभागी होणार आहेत. ही रॅली शहरासह महामार्गावरून काढली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात गांधी मैदान येथून केली जाणार आहे. जनजागृती करण्यासाठी घरोघरी माहितीपत्रके, वाहनांवर स्टीकर लावणे आदी कामे सुरु करण्यात आली आहेत.
यावेळी जिल्हा व शहर कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, लाॅरी ऑपरेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे, हेमंत डिसले, लोकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय कडवेकर, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, वाळू वाहतूक संघटना अध्यक्ष विजय पाटील, विजय तेरदाळकर, बस ओनर्स असोसिएशनचे प्रदीप राठोड, शिरोली नागाव ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना अध्यक्ष राजेंद्र जाधव, चंदू भोसले, कॉमन मॅन रिक्षा संघटनेचे बाबा इंदुलकर, जाफर मुजावर, अविनाश दिंडे, आदर्श रिक्षा संघटना ईश्वर चैन्नी, सुभाष शेटे, आम आदमी रिक्षा संघटनेचे राकेश गायकवाड, भाजप रिक्षा संघटनेचे नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.