शिवाजी विद्यापीठात ‘आजादी का अमृतमहोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:23+5:302021-03-24T04:21:23+5:30

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तेजस्वी कामगिरी बजावणाऱ्या महान नेतृत्वांविषयी उपलब्ध ग्रंथांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे. त्यांचा आदर्श अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच ‘आजादी ...

'Azadi Ka Amrut Mahotsav' at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात ‘आजादी का अमृतमहोत्सव’

शिवाजी विद्यापीठात ‘आजादी का अमृतमहोत्सव’

googlenewsNext

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तेजस्वी कामगिरी बजावणाऱ्या महान नेतृत्वांविषयी उपलब्ध ग्रंथांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे. त्यांचा आदर्श अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच ‘आजादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने सार्थक झाला, असे म्हणता येईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, नीलांबरी जगताप, दत्तात्रय मछले, आदी उपस्थित होते. दरम्यान, या प्रदर्शनात नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या जीवनपटासह त्यांच्याविषयीच्या शंभरहून अधिक पुस्तकांची मांडणी केली आहे. हे प्रदर्शन गुरुवार (दि. २५)पर्यंत सुरू राहणार आहे.

चौकट

दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

‘आजादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमांतर्गत मानव्यशास्त्र इमारतीमध्ये महात्मा गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य’ या विषयावरील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ते शनिवारपर्यंत (दि. २७) पाहण्यास खुले राहणार आहे.

फोटो (२३०३२०२१-कोल-ग्रंथप्रदर्शन ०१) : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी अवनीश पाटील, नीलांबरी जगताप, नमिता खोत, आदी उपस्थित होते.

फोटो (२३०३२०२१-कोल-ग्रंथप्रदर्शन ०२) : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पुस्तकांची पाहणी केली.

Web Title: 'Azadi Ka Amrut Mahotsav' at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.