बी. ए. अभ्यासक्रमाच्या दीड हजार विद्यार्थ्यांना मिळाला चुकीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:47+5:302021-09-07T04:30:47+5:30
बी. ए. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रातील मानसशास्त्र विषयाचा पेपर सोमवारी दुपारी अडीच वाजता होता. पेपर सुरू झाल्यानंतर काही ...
बी. ए. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रातील मानसशास्त्र विषयाचा पेपर सोमवारी दुपारी अडीच वाजता होता. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, तो अभ्यासक्रमाच्या बाहेरील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी पेपर सोडविला. त्यावर काही विद्यार्थ्यांनी त्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे विद्यापीठाला दिली. परीक्षा मंडळाने परीक्षार्थींना ई-मेलव्दारे संबंधित पेपर तांत्रिक कारणास्तव रद्द केल्याचे कळवले. तसेच या विषयाचा सुधारित पेपर परीक्षार्थींनी मंगळवारी दुपारी अडीच वाजता द्यावा, असे कळविण्यात आले. दरम्यान, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘बी. ए.’च्या इंग्रजी विषयाचा पेपर (क्रमांक पाच) झाला. मात्र, तो पेपर चुकीचा पाठवण्यात आला होता, हे विद्यापीठाच्या लक्षात विद्यार्थ्यांनी आणून दिले. परीक्षा मंडळाने त्याचदिवशी सायंकाळी साडेपाच वाजता सुधारित पेपर पाठवला. त्याची माहिती ज्या विद्यार्थ्यांना मिळाली, त्यांनी पेपर दिला.
प्रतिक्रिया
तांत्रिक कारणामुळे बी. ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर मिळाला. त्यांना जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर गेला. सुधारित पेपर देऊन मंगळवारी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. त्याबाबत या विद्यार्थ्यांना ई-मेल, व्हाईस कॉल, मोबाईल मेसेजव्दारे कळविण्यात आले आहे.
- गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ.