बी. टेक., एम. एस्सीसह विविध २८ परीक्षांचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:21+5:302021-05-06T04:26:21+5:30
या हिवाळी सत्रातील परीक्षा २२ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. त्यातील विविध २१ परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यानंतर बुधवारी ...
या हिवाळी सत्रातील परीक्षा २२ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. त्यातील विविध २१ परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्यानंतर बुधवारी अन्य २८ परीक्षांचे निकाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून जाहीर करण्यात आले. त्यात बी. एस. डब्ल्यू., बी. आय. डी., बी. ए. ड्रेस मेकिंग., बी. व्होक. (टुरिझम ॲण्ड सर्व्हिस इंडस्ट्रीज सेमिस्टर पाच)., एम. ए. संस्कृत सेमिस्टर तीन व चार., इंडस्ट्रीयल केमिस्ट्री सेमिस्टर तीन., बी. व्होक. प्रिंटींग ॲण्ड पब्लीशिंग सेमिस्टर पाच, सस्टेनेबल ॲॅग्रीकल्चर सेमिस्टर तीन आणि पाच, बी. टेक सेमिस्टर सात, बी. ए. मल्टीमीडिया. बी. एस्सी. एफटीएम., एम. ए. रशियन सेमिस्टर तीन आणि चार, आदी २१ अभ्यासक्रमांचा समावेश असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी हिवाळी सत्रातील एकूण २६ अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. त्यासाठी एकूण १७३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६९५२ जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली.