यशवंतराव पाटील महाविद्यालयात बी. ए., बी. काॅम व एम. एस्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:52+5:302021-06-26T04:17:52+5:30
या महाविद्यालयात यापूर्वी शंभर टक्के अनुदानित विज्ञान शाखा कार्यरत आहे, तसेच आधुनिक सुसज्ज अशी तीन मजली भव्य इमारत, प्रशस्त ...
या महाविद्यालयात यापूर्वी शंभर टक्के अनुदानित विज्ञान शाखा कार्यरत आहे, तसेच आधुनिक सुसज्ज अशी तीन मजली भव्य इमारत, प्रशस्त प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण, निसर्गरम्य परिसर लाभलेला आहे. दहावी व बारावीच्या चांगल्या निकालाची परंपरा कायम आहे. पाचवी ते पदवीपर्यंत हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या भागातील विज्ञान विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या मुलींना एम.एस्सीच्या शिक्षणासाठी कोल्हापूरशिवाय पर्याय नव्हता. या अभ्यासामुळे मुलीची फरपट थांबणार आहे.
अध्यक्ष आर. वाय. पाटील म्हणाले, व्यवसाय उपक्रमशील शिक्षण वर्ग सुरू करणार आहोत.
या अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव ए. वाय. पाटील यांच्यासह अध्यक्ष आर. वाय. पाटील, प्राचार्य डॉ. जी. जी. चौगले यांनी विशेष प्रयत्न केले.