बाप रे....नागाने गिळला विषारी घोणस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 06:32 PM2021-12-07T18:32:06+5:302021-12-07T18:59:00+5:30
भूकेसाठी नागाने घोणस जातीच्या विषारी सापाला गिळकृत केलेली आश्चर्यकारक घटना पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील शेतकरी शामराव नायकू चेचर यांच्या जनावराच्या गोठ्यात अनुभवायास मिळाली.
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : बेडूक, उंदीर, सरडा, यासारखे अन्य जीव नागाचे मुख्य भक्ष्य मानले जातात. परंतू भूकेसाठी नागाने घोणस जातीच्या विषारी सापाला गिळकृत केलेली आश्चर्यकारक घटना पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील शेतकरी शामराव नायकू चेचर यांच्या जनावराच्या गोठ्यात अनुभवायास मिळाली. जंगलांची संख्या घटू लागल्याने जैवविविधतेतील अस्तित्वाला धोका पोहचू लागला आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात वन्यप्राण्यांचा मानव वस्तीतील वाढता शिरकाव चिंताजनक आहे.
पोर्लेतील चेचर शिवारातील शामराव चेचर यांच्या जनावरांच्या गोठ्यात सांयकाळी पाचच्या सुमारास उंबऱ्यावर फना काढून नाग वाटेत आडवा उभारला होता. त्याला सर्पमित्र सुरेश चेचर यांनी पकडल्यानंतर त्याने गळ ओकायला सुरूवात केली. आश्चर्याची गोष्टी म्हणजे नागाने घोणस जातीचा विषारी सापाला मारून, गिळकृत केले होते.
त्यांनतर सर्पमित्र यांनी मेलेल्या सापाची योग्य विल्हेवाट लावली, तर नागाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. दरम्यान केर्ले ता.करवीर येथील दगडी कारखान्यात सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी नाग पकडला होता. त्या नागाने तस्कर नावाचा बिनविषारी साप गिळला होता.
जैवविविधतेवर परिणाम होऊ लागल्याने अन्नसाखळीत धोका
डोगर, जंगलांना आग लावण्याचे प्रकार वाढत असल्याने जंगलातील जीवजंतू आगीत मरण पावतात अथवा जीव वाचविण्यासाठी स्थलांतरीत होतात. याचा जैवविविधतेवर परिणाम होऊन अन्नसाखळीचं धोक्यात येऊ लागली आहे. वन्यप्राण्यांना भक्ष्यचं मिळत नसल्याने प्राणीच प्राण्यांची शिकार करत. या प्रकाराला पर्यावरणाचा होत चाललेल्या ऱ्हासांच्या बाबी कारणीभूत आहे.
गाभीर्याने घेण्याची गरज
माझ्या ४० वर्षाच्या अनूभवात सापाने सापाला गिळताने पाहिलेले नाही. परंतू अलिकडे सापाचं सापाचे भक्ष्य करताना अनेक अनुभव पाहावसाय मिळत आहे. हे अन्नसाखळीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मानवी वस्ती वन्य प्राण्यांचा वाढता शिरकाव मानव जातीसाठी चिंताजनक गोष्ट आहे. हे गाभीर्याने घेतले पाहिजे. - सर्पमित्र, दिनकर चौगुले, पोर्ले तर्फ ठाणे