बबन शिंदे, समीक्षा खरे ‘लोकमत महामॅरेथाॅन’चे विजेते

By संदीप आडनाईक | Published: January 8, 2023 10:00 PM2023-01-08T22:00:04+5:302023-01-08T22:01:21+5:30

पहाटेच्या मनाला सुखावणाऱ्या शीतल वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक, युवतींचा आत्मविश्वास अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात कोल्हापूरची ‘लोकमत महामॅरेथाॅन’ रंगली.

Baban Shinde, Samiksha Khare winner of 'Lokmat Mahamarathon' | बबन शिंदे, समीक्षा खरे ‘लोकमत महामॅरेथाॅन’चे विजेते

बबन शिंदे, समीक्षा खरे ‘लोकमत महामॅरेथाॅन’चे विजेते

googlenewsNext

कोल्हापूर : पहाटेच्या मनाला सुखावणाऱ्या शीतल वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक, युवतींचा आत्मविश्वास अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात कोल्हापूरची ‘लोकमत महामॅरेथाॅन’ रंगली. अत्यंत जल्लोषी वातावरणात रंगलेली महामॅरेथाॅन खुल्या गटात बबन शिंदे, तर समीक्षा खरे हिने जिंकली. बबनने पुरुषांमधील २१ किलोमीटरची शर्यत १ तास ११ मिनिटे १२ सेकंदांत, तर समीक्षाने १ तास ३६ मिनिटे आणि २६ सेकंदांत पूर्ण केली. कोल्हापूरचा मान लोकमत मॅरेेथॉन अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केली.

सहा वाजता २१ किलोमीटरच्या खुल्या गटातील धावपटूंना मान्यवरांनी फ्लॅग ऑफ केला आणि स्पर्धकांचा लोंढा धावू लागला. ठराविक वेळेनंतर एकापाठोपाठ एका गटातील स्पर्धा सोडण्यात आली. प्रत्येकवेळी स्पर्धेतील थरार व उत्साह वाढत गेला. या स्पर्धेचे नियोजन इतके जबरदस्त होते की स्पर्धकांना निकोप स्पर्धेचा आणि जल्लोषी वातावरणाचा वेगळाच अनुभव घेता आला. या स्पर्धेने कोल्हापूरच्या क्रीडा विश्वात एक वेगळीच ओळख प्रस्थापित केल्याचे प्रत्यंतर यावेळी आले.

स्पर्धेच्या उद्घाटनास सर्वपक्षीय नेतेमंडळींनी भल्या पहाटे सुद्धा आवर्जून उपस्थिती दर्शविली. त्यामध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ,आमदार ऋतुराज पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, विद्या आराधनाचे संचालक संजय लड्डा, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, अभिजीत पाटील, इंडोकाऊंटचे प्लॅन्ट हेड शैलेश सरनोबत, पुण्यातील एमआयटीच्या प्रोफेसर सविता शिंदे, अजय उगले, जनसुराज्य शक्तीचे समित कदम, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सिद्धी विनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप पाटील, फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रसनजीत निकम, ‘लाेकमत’चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले उपस्थित होते.

नागपूरला ५ फेब्रुवारीला यायचं..

राज्यभरात लोकप्रियतेचे नवनवे शिखर गाठणाऱ्या महामॅरेथाॅनची पुढील स्पर्धा ५ फेब्रुवारीला नागपुरात होणार आहे.

विविध गटांतील निकाल

२१ किलोमीटर (खुला गट-पुरुष) १. बबन शिंदे, १ तास ११ मिनिटे १२ सेकंद, २. चंद्रकांत मनवाडकर, १ तास ११ मिनिटे २६ सेकंद, ३. प्रवीण कांबळे, १ तास १२ मिनिटे.

२१ किलोमीटर (खुला गट-महिला) १. समीक्षा खरे, १ तास ३६ मिनिटे २६ सेकंद, २. राधा कौसोदीकर, १ तास ५४ मिनिटे २० सेकंद, ३. मानसी लोखंडे, २ तास १७ मिनिटे ३९ सेकंद.
१० किलोमीटर (खुला गट-पुरुष) १. गोल्डी गोस्वामी, ३२ मिनिटे ९ सेकंद, २. प्रधान किरूळकर, ३२ मिनिटे २० सेकंद, ३. रोहित जाधव, ३३ मिनिटे ११ सेकंद.

१० किलोमीटर (खुला महिला गट) १. संस्कृती वर्हाड, ३९ मिनिटे ५०सेकंद, २. शिवानी कुलकर्णी, ४१ मिनिट ५१ सेकंद, ३. वर्षा कदम, ४३ मिनिटे ५ सेकंद,
१० किलोमीटर (वेटरन, पुरुष) समीर कोल्या, ३८ मिनिटे १९ सेकंद, २. रणजित कणबरकर, ३९ मिनिटे ०१ सेकंद, ३. अरविंद नलावडे, ३९ मिनिटे ०४ सेकंद.

१० किलोमीटर (वेटरन महिला) १. बाला राेकडे, ५६ मिनिटे ०९ सेकंद, २. अनिता पाटील, ५७ मिनिटे २५ सेकंद, ३. मयुरा शिवलकर, ५९ मिनिटे ३० सेकंद.
१० किलोमीटर (निओ वेटरन पुरुष) १. मल्लिर्काजुन, ३५ मिनिटे २६ सेकंद, लिंगाण्णा मंचिकांते, ३५ मिनिटे २८ सेकंद, परशराम कुणागी, ३५ मिनिटे ४० सेकंद.

१० किलोमीटर (निओ वेटरन महिला) १. शारदा काळे, ४८ मिनिटे १३ सेकंद, २. प्रतिभा नाडकर, ५० मिनिटे १७ सेकंद, स्मिता शिंदे, ५१ मिनिटे.
२१ किलोमीटर हाफ मॅरेथाॅन (पुरुष निओ वेटरन) १. परशराम भोई, १ तास १२ मिनिटे ५ सेकंद, २. रमेश गवळी , १ तास १२ मिनिटे २३ सेकंद, संतू वारडे , १ तास १८ मिनिटे ८ सेकंद.

२१ किलाेमीटर हाफ मॅरेथाॅन (महिला नियो वेटरन) १. रंजना पवार, १ तास ४० मिनिटे ४० सेकंद, २. वैशाली गर्ग, १ तास ४५ मिनिटे २० सेकंद, ३. सयुरी दळवी, १ तास ४७ मिनिटे ५० सेकंद.
२१ किलोमीटर (प्रौढ पुरुष) १. भास्कर कांबळे, १ तास २१ मिनिटे २६ सेकंद, २. शिवांगाप्पा गुटागी, १ तास २४ मिनिटे ३५ सेकंद, ३. मनोहर जेधे, १ तास २७ किलोमीटर ३२ सेकंद.

२१ किलोमीटर (प्रौढ महिला) १. डाॅ. पल्लवी मूग, १ तास ४५ मिनिटे ४४ सेकंद, २. दीपा तेंडूलकर, १ तास ५९ मिनिटे, ३. विद्या चव्हाण, ३ तास ८ मिनिटे १६ सेकंद.
हाफ मॅरेथाॅन (डिफेन्स, पुरुष) १. परसाप्पा हाजीजोळ, १ तास ७ मिनिटे , २. निरज निरज, १ तास ७ मिनिटे ८ सेकंद. ३. सुनीलकुमार, १ तास १० मिनिटे ६ सेकंद.

हाफ मॅरेथाॅन डिफेन्स महिला)१. अर्चना एम, १ तास २८ मिनिटे ५७ सेकंद, २. विनिता पाल, १ तास ३८ मिनिटे ४५ सेकंद, ३. रविता राजभार, १ तास ५७ मिनिटे ३४ सेकंद.

Web Title: Baban Shinde, Samiksha Khare winner of 'Lokmat Mahamarathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.