बाबासाहेब मोहिते यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:55+5:302021-07-03T04:16:55+5:30
रूकडी (ता. हातकणंगले) हे मूळ गाव असणारे माजी सहसचिव बाबासाहेब मोहिते हे सध्या कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे राहत होते. ...
रूकडी (ता. हातकणंगले) हे मूळ गाव असणारे माजी सहसचिव बाबासाहेब मोहिते हे सध्या कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे राहत होते. येथील निवासस्थानी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत सकाळी साडेनऊच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहिते हे डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी होते. पुढे त्यांना विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी बापूजींनी दिली. मोहिते यांनी संस्थेत मुख्याध्यापक, प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत ३५ वर्षे सेवा बजावली. संस्थेचे अर्थसचिवपदाचे दोन वर्षे, तर सहसचिवपदाचे तीन वर्षे काम पाहिले. संस्थेचे ते आजीव सेवक होते. त्यांनी संस्थेमध्ये डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचाराने आणि तत्वाने कार्यरत राहून मोलाचे योगदान दिले.
फोटो (०२०७२०२१-कोल-बाबासाहेब मोहिते (निधन)
020721\02kol_7_02072021_5.jpg
फोटो (०२०७२०२१-कोल-बाबासाहेब मोहिते (निधन)