बाबासाहेबांचे लंडनमधील घर दुरुस्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:17 AM2017-11-18T01:17:14+5:302017-11-18T01:17:51+5:30

Babasaheb's house in London will be repaired | बाबासाहेबांचे लंडनमधील घर दुरुस्त होणार

बाबासाहेबांचे लंडनमधील घर दुरुस्त होणार

Next

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घटनेचे शिल्पकार व कोट्यवधी दलित जनतेचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनस्थित घर राज्य शासनाने खरेदी केले असून, या घराच्या दुरुस्तीसाठी शासनाने ३ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढला आहे.
लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना डॉ. आंबेडकर हे १९२१-२२ मध्ये लंडनमधील १० किंग्ज हेन्री रोड एन. डब्लू-३ या घरात राहात होते. हे घर राज्य शासनाने खरेदी करून तिथे त्यांचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हे घर खरेदी केले आहे. या घराची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झोन असोसिएटस लिमिटेड या कंपनीची सर्वांत कमी दराची निविदा असल्याने तीच अंतिम करण्यात आली आहे. या घराच्या नूतनीकरणासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयास ३ कोटी ५५ लाख ५६५ इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार होती. तसे भारतीय उच्चायुक्तांकडूनही कळविण्यात आले होते. मूळ या सगळ््या कामासाठी ७ कोटी ४७ लाख ८२ हजार १५७ रुपयांचा निधी आवश्यक आहे. परंतु बदलता चलन दर विचारात घेऊन व जुलै २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या नियमानुसार त्यातील ७० टक्के रक्कम म्हणजे ३ कोटी १५ लाख निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: Babasaheb's house in London will be repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.