बाबुराव पेंटर यांची कन्या कुमुदिनी बॅनर्जी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 01:23 PM2022-12-24T13:23:58+5:302022-12-24T13:24:15+5:30
कोल्हापूर : भारतीय सिनेसृष्टीत नावीन्याचा मुहूर्तमेढ लावलेले व कोल्हापूरच्या सिनेसृष्टीचे जनक कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या ज्येष्ठ कन्या कुमुदिनी बॅनर्जी ...
कोल्हापूर : भारतीय सिनेसृष्टीत नावीन्याचा मुहूर्तमेढ लावलेले व कोल्हापूरच्या सिनेसृष्टीचे जनक कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या ज्येष्ठ कन्या कुमुदिनी बॅनर्जी (वय ९०) यांचे शुक्रवारी पहाटे खरी कॉर्नर येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी प्रिया, विजयमाला, आशा, शशिकला पेंटर या बहिणी असा परिवार आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना आठ अपत्ये. सहा मुली, दाेन मुले. सर्वात मोठे रवींद्र मेस्त्री. त्यांच्यानंतर कुमुदिनी यांचा जन्म झाला. विवाहानंतर त्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, तर मुलगी अमेरिकेत असते. अहमदाबादमध्ये त्यांच्यासोबत बहीण शशिकला राहत होत्या. वय झाल्याने या दोघीही ६ महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आल्या. तेंव्हापासून चौघी बहिणी एकत्र राहत होत्या. याआधी रवींद्र, अरविंद मेस्त्री व अन्य दोन बहिणींचे निधन झाले आहे. पंचगंगा स्मशानभूमीत कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.