बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:42 AM2017-08-05T00:42:38+5:302017-08-05T00:43:34+5:30
कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसविणारे श्रीपूजक बाबूराव उर्फ दत्तात्रय ठाणेकर यांना शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिरातून बाहेर घालविले. पुजारी हटाओ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ठाणेकर पितापुत्रांना जिल्हा व पोलीस प्रशासनाने अंबाबाई मंदिरात प्रवेशबंदी केली होती. मात्र, त्या बंदीचे उल्लंघन करून बाबूराव ठाणेकर आपल्या वाराला मंदिराच्या गाभाºयात आले होते.
कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसविणारे श्रीपूजक बाबूराव उर्फ दत्तात्रय ठाणेकर यांना शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिरातून बाहेर घालविले. पुजारी हटाओ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ठाणेकर पितापुत्रांना जिल्हा व पोलीस प्रशासनाने अंबाबाई मंदिरात प्रवेशबंदी केली होती.
मात्र, त्या बंदीचे उल्लंघन करून बाबूराव ठाणेकर आपल्या वाराला मंदिराच्या गाभाºयात आले होते.
श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी आपल्या वारात ९ जून रोजी अंबाबाई मूर्तीला योगेश जोशी यांनी दिलेली घागरा-चोली नेसविली होती. त्या घटनेचे पर्यवसान अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनात झाले असून, अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शिक्षेसंबंधी निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती.
दुसºयाच दिवशी झालेल्या बैठकीत संघर्ष समितीने बाबूराव व अजित ठाणेकर या पितापुत्रांना अंबाबाई मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.दरम्यान, श्रीपूजक बाबूराव ठाणेकर यांचा अंबाबाई पूजेचा आठवडा दर दीड ते दोन महिन्यांनी येतो. शुक्रवारपासून वार सुरू झाल्याने त्यांनी ही बंदी डावलून सकाळपासूनच अंबाबाईच्या गाभाºयात हजेरी लावली. संघर्ष समितीचे पदाधिकारी मंदिरात जाऊन बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर घालविणार होते.
हा गोंधळ होऊ नये म्हणून देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे यांनी ही बाब जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना कळविली. जिल्हाधिकाºयांनी तातडीने पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दूरध्वनी केला. पोलीस अधीक्षकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांना बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर घालविण्याची सूचना केली.
त्यानुसार दुपारी दोन वाजता सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्यासह साध्या वेशातील दोन पोलिसांनी बाबूराव ठाणेकर यांना गाभाºयातून बाहेर बोलावून मंदिराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र बाबूराव ठाणेकर यांनी नकार दिला. अखेर पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिराबाहेर पाठविले.
छायाचित्रकाराशी वाद
या घटनेचे छायाचित्र घेण्यासाठी गेलेल्या वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराला ठाणेकर यांनी ‘छायाचित्र का घेतोस?’ असे म्हणत वाद घातला व कॅमेरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविले. दरम्यान, संघर्ष समितीने या प्रकाराचा निषेध केला.