पंधरा वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची नोंद करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:18 AM2021-06-10T04:18:05+5:302021-06-10T04:18:05+5:30

कोल्हापूर : जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील तरतुदीनुसार जन्म नोंदणीमध्ये नोंदणी दिनांकापासून १५ वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची नोंद करण्याची तरतूद आहे. ज्या ...

The baby's name can be registered for up to fifteen years | पंधरा वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची नोंद करता येणार

पंधरा वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची नोंद करता येणार

Next

कोल्हापूर : जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील तरतुदीनुसार जन्म नोंदणीमध्ये नोंदणी दिनांकापासून १५ वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची नोंद करण्याची तरतूद आहे. ज्या नागरिकांच्या मुलांच्या जन्माच्या नावाशिवाय इतर नावाची नोंदणी १ जानेवारी २००० पूर्वी झालेली आहे व ज्यांच्या नोंदणीला १५ वर्षे कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा सर्व नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.

नाव जन्म रजिस्टरमध्ये नोंदण्याकरिता बाळाचे नाव समाविष्ट करण्याबाबतचा अर्ज महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध आहेत. नावाची नोंदणी करताना नावाचा एक शासकीय पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, एस.एस.सी. प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांच्या प्रति अर्जासोबत सादर कराव्या लागणार आहे. जन्म नोंदणीच्या वेळेस अर्जदाराने ठेवलेले नाव बदलता येणार नाही. त्या नाव नोंदणीची मुदत फक्त २७ एप्रिल २०२६ पर्यंतच आहे. त्यानंतर नाव समाविष्ट करण्याचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही. याची नोंद घ्यावी. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन निबंधक जन्म मृत्यू विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: The baby's name can be registered for up to fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.