बच्चन वेडे कोल्हापुरीच असे आॅनलाईन करू शकतात... भारतात आणि परदेशातही दाखविली आपली ही अदाकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:06 PM2020-05-05T17:06:36+5:302020-05-05T17:32:07+5:30
व्हॉटसअपवर आयोजित केलेल्या गाण्याच्या स्पर्धेला केवळ कोल्हापूरच नव्हे तर देश-विदेशातूनही सहभाग नोंदविला गेला आणि ही स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली. एकापेक्षा एक आवडीची गाणी गाऊन बच्चनवेडी प्रेमीनी ही स्पर्धा संस्मरणीय अशीच केली.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग स्तब्ध आहे. लॉकडॉऊनमुळे देशवासिय घराघरात बसून आहेत. काहीजण आपली कला, रेसीपी, छंद जोपासत आहेत. अशातच कोल्हापूरी मात्र लयभारी. म्हणूनच म्हणतात ना जगात भारी कोल्हापुरी. निवांत बसेल तो कसला कोल्हापूरी.. लॉकडाऊनच्या काळातही येथील 'बच्चनवेडे कोल्हापूरी' यांनी व्हॉटसअपवर आयोजित केलेल्या गाण्याच्या स्पर्धेला केवळ कोल्हापूरच नव्हे तर देश-विदेशातूनही सहभाग नोंदविला गेला आणि ही स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली. एकापेक्षा एक आवडीची गाणी गाऊन बच्चनवेडी प्रेमीनी ही स्पर्धा संस्मरणीय अशीच केली.
घर बसल्या हौशी गायकानी कोल्हापुर, कराड, सातारा, पुणे, सांगली, उस्मानाबाद , कर्नाटक राज्य आणि दुबई येथून बच्चन गाणी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, एकूण 126 स्पर्धाकांनी भाग घेतला. एकूण स्त्री - पुरुष मिळून 6 विजेते घोषित केले गेले..सम्पूर्ण स्पर्धा ऑन लाइन पद्धतिने व्हाट्सअप वर घेण्यात आली... त्यामुळे या बच्चनवेडे कोल्हापूरी ची चर्चा मात्र यानिमित्ताने खूपच रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
स्पर्धा कमिटी उपसरपंच कमिटी कुंदन ओसवाल, शुभदा कुलकर्णी, लक्ष्मण कांबळे, सचिन गायकवाड तर स्पर्धा परीक्षक : सूरज नाईक, सरिता सुतार, प्रसाद जमदग्नी होते.
या स्पर्धेचा निकालही जाहीर झाला असून तो असा आहे.
- अंतिम फेरी विजयी उमेदवार
1. तेजस अतिग्रे
तुम हो मेरे दिल की धडकन
2. प्रशांत प्रभावळकर
बने चाहे दुष्मन जमाना
3. जितेंद्र कामत
खैके पान बनारसवाला
4. शशिकांत जाधव
जहा चार यार मिल जाये
5. अनिल सुतार
तानेदीन तंदाना
महिला स्पर्धक .....
1. अंजली गायकवाड
अन्ग्रेजी मे केहते है के कछव
2. अर्चना पदकी
समंदरमे नहाके और भि नमकीन
आयोजक टीम👇🏼👇🏼👇🏼
बच्चनवेडे ग्रुप करिता
संकल्पना- सुधर्म वाझे, ग्रुप ऍडमिन,
राजू नान्द्रे , व्हाईस ऍडमिन